मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'आजोबांकडून ट्यूशन घ्या', रोहित पवारांच्या गौप्यस्फोटावर भाजपचा पलटवार

'आजोबांकडून ट्यूशन घ्या', रोहित पवारांच्या गौप्यस्फोटावर भाजपचा पलटवार

पवार कुटुंबाला फोडण्याचा विरोधकांचा डाव आहे, असं खळबळजनक गौप्यस्फोट पवार कुटुंबातील सदस्य आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला

पवार कुटुंबाला फोडण्याचा विरोधकांचा डाव आहे, असं खळबळजनक गौप्यस्फोट पवार कुटुंबातील सदस्य आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला

पवार कुटुंबाला फोडण्याचा विरोधकांचा डाव आहे, असं खळबळजनक गौप्यस्फोट पवार कुटुंबातील सदस्य आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 18 ऑक्टोबर : शिवसेना फोडल्यानंतर विरोधकांचं पुढचं टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस आहे. पवार कुटुंबाला फोडण्याचा विरोधकांचा डाव आहे, असं खळबळजनक गौप्यस्फोट पवार कुटुंबातील सदस्य आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवारांच्या या वक्तव्यावर भाजपकडून पलटावर करण्यात आला आहे. आपलं वय काय, आपण किती बोलतो, याचा विचार करा. आजोबांकडून ट्यूशन घ्या, असा टोला भाजप आमदार प्रसाद लाड यांनी लगावला आहे.

'रोहित पवारांना काय बोलायचंय हे त्यांनी त्यांच्या घरातच पाहिलं पाहिजे. भाजपची ही संस्कृती नाही, भाजपने कधीच अशाप्रकारे उद्योग केलेले नाहीत. रोहित पवारांचा कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, अशाप्रकारचं वक्तव्य आहे. त्यांना कुणाबद्दल बोलायचं आहे. घरातल्या कोणत्या व्यक्तीबद्दल बोलायचं आहे, हे त्यांनी ठरवलं पाहिजे. आपलं वय किती आहे आणि आपण किती बोलतो आहोत, याबद्दल रोहित पवारांनी विचार केला पाहिजे. आजोबांकडून त्यांनी ट्यूशन घेतली पाहिजे', असं प्रसाद लाड म्हणाले.

महाजनांचा गुगली

भाजप नेते गिरीश महाजन यांना रोहित पवारांनी केलेल्या या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. कोणामध्येही फूट पाडण्याचा आमचा प्रयत्न नाही. त्यांनी त्यांचं घर सांभाळावं, हा त्यांचा अंतर्गत कलह असेल. भविष्यात काही घडणार असेल आणि त्याची चाहूल लागल्याने ते आता आमच्यावर खापर फोडत असतील, असा गुगली गिरीश महाजन यांनी टाकला आहे.

पुढचं टार्गेट पवार कुटुंब? रोहित पवारांच्या गौप्यस्फोटावर भाजपचा गुगली

अजित पवारांची सारवासारव

दरम्यान रोहित पवारांच्या या वक्तव्यावर अजित पवार यांनी सारवासारव केली आहे. काहीतरी गैरसमज झाला असेल. रोहित पवार असं बोलूच शकत नाही. तसं काही असेल तर त्यांना मी दुरुस्त करायला सांगतो. रोहितशी बोलावं लागेल, त्याने नेमकं कशामुळे हे वक्तव्य केलं ते पाहावं लागेल. अनेकवेळा माध्यमांमध्ये वक्तव्याचा विपर्यास होतो, असं अजित पवार म्हणाले.

रोहित पवारांच स्पष्टीकरण

हा सगळा वाद वाढल्यानंतर अखेर रोहित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'फोडाफोडीचं राजकारण होत आहे. शिवसेना हा मोठा पक्ष फोडण्यात आला. एक मोठा पक्ष फोडल्यानंतर फोडाफोडीचंच राजकारण करायचं असेल, तर दुसरा मोठा पक्ष हा राष्ट्रवादी आहे. एक मोठा पक्ष फोडल्यानंतर पुढचं टार्गेट हे राष्ट्रवादी असू शकतं, असं मी बोलता बोलता म्हणालो. मी भाजप म्हणालो नव्हतो, तर विरोधात असलेल्या पक्षाचं, असं मी म्हणालो होतो,' असं रोहित पवारांनी सांगितलं.

पवार कुटुंबात फुटीसाठी डाव, पण विरोधक 'भाजप' नाही मग कोण? रोहित पवारांचा इशारा नेमका कुठे?

First published:

Tags: Ajit pawar, NCP, Sharad Pawar