मुंबई, 5 ऑगस्ट: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत कथित आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजिव आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मौन सोडलं आहे. आदित्य ठाकरे यांनी एक फेसबूक नोट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी हे गलिच्छ राजकारण असल्याचे नमूद केले आहे. आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात ट्वीट केले आहे. हेही वाचा… सुशांत सिंह राजपूत प्रकरणी SC ने मुंबई पोलिसांना 3 दिवसांत मागितला अहवाल दरम्यान, भाजप नेते नारायण राणे सुशांत सिंह प्रकरणात पत्रकार परिषद घेऊन ही सुशांत सिंहची आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केला आहे, शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर आरोप केला आहे. यामध्ये शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, आदित्य ठाकरे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. आता यावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिनं थेट आदित्या ठाकरे यांना निशाणा साधला आहे. एकापाठोपाठ चार ट्वीट करून कंगना हिनं आदित्य ठाकरे यांनी 7 सवाल केले आहेत.
2) Why @MumbaiPolice didn’t take FIR on SSR’s unnatural death?
— Kangana Ranaut (@KanganaTeam) August 4, 2020
3) When a complaint was made about SSR’s life being in danger in the month of Feb, why @MumbaiPolice called it a suicide on day one? ..(2/4)
कंगनानं म्हटलं आहे की, ‘पाहा कोण गलिच्छ राजकारणावर चर्चा करत आहे. तुमच्या वडिलांना मुख्यमंत्रिपदाची खूर्ची मिळाली आहे. हेच गलिच्छ राजकारण आहे. आता राजकारण विसरा आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणी आपल्या वडिलांकडून आधी 7 प्रश्नांची उत्तरं घेऊन या’ हेही वाचा… दिनो मोर्याने नारायण राणेंना ठरवलं खोटं, केला महत्त्वाचा खुलासा मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी FIR का नोंदवली नाही? फेब्रुवारीमध्ये सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी पोलिसांना माहिती दिली होती की, सुशांतच्या जीवाला धोका आहे. मग मुंबई पोलिसांनी सुशांतचा मृत्यूला ‘सुसाइड’ का घोषित केलं? आपल्याकडे फॉरेंसिक एक्सपर्ट का नाही आहे. सुशांतच्या फोन रेकॉर्ड का उपलब्ध नाहीत. त्यानं मृत्यूच्या एक आठवडा आधी कोणाकोणाला फोन केले होते? आयपीएस अधिकारी विनय तिवारीला विनाकारण क्वारंटाइन का करण्यात आलं? सीबीआय चौकशीच्या मागणीची सगळ्यांना भीती का वाटत आहे? रिया आणि तिच्या कुटुंबीयांनी सुशांतचा पैसा कसा लुटला? असे एकापाठोपाठ सात प्रश्नांचा भडिमार कंगनानं आदित्य ठाकरे यांना केला आहे.