दिनो मोर्याने नारायण राणेंना ठरवलं खोटं, केला महत्त्वाचा खुलासा

दिनो मोर्याने नारायण राणेंना ठरवलं खोटं, केला महत्त्वाचा खुलासा

'कुणावर आरोप करण्याआधी किमान सत्य परिस्थिती आणि अचूक माहिती तरी जाणून घ्या'

  • Share this:

मुंबई, 05 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी भाजपचे नेते नारायण राणे यांनी राज्य सरकारला टार्गेट करत अनेक आरोप केले होते. परंतु, त्यांच्या या आरोपातून अभिनेता दिनो मोर्याने हवाच काढली आहे. दिनो मोर्याने राणेंच्या आरोपावर उत्तर दिले आहे.

भाजपचे नेते नारायण राणे यांनी मंगळवारी मुंबई पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी राणे यांनी अभिनेता दिनो मोर्याचा उल्लेख करत गंभीर आरोप केले होते.

आज दिनो मोर्याने ट्वीट करून नारायण राणे यांचे आरोप फेटाळून लावले आहे.  'सुशांत सिंह राजपूतसाठी 13 जून रोजी कोणत्याही पार्टीचं आयोजन केलं नव्हते, असा खुलासा दिनो मोर्याने केला आहे.

नाशिक पोलिसांनी बजावली साधू-पुरोहितांना नोटीस, महाआरती करण्यास मनाई

तसंच, 'कुणावर आरोप करण्याआधी किमान सत्य परिस्थिती आणि अचूक माहिती तरी जाणून घ्या, उगाच कुणावरही आरोप करू नका' असं म्हणत दिनो मोर्याने नारायण राणेंना फटकारून काढलं आहे.

'सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही, कृपा करून माझे नाव यात घेऊ नका' अशी विनंतीही दिनो मोर्याने केली आहे.

काय म्हणाले होते नारायण राणे?

दिनो मोर्याच्या घरी अनेक राजकीय नेत्यांचे येणे जाणे सुरू होते. त्याच्या घरीच सुशांत आला होता.  13 तारखेला घरी पार्टी झाली होती. या पार्टीला कोण कोण होतं, त्यांची नाव का समोर आली नाही. त्यांना अटक का झाली नाही?' असे सवाल राणेंनी उपस्थितीत केले.

तसंच, दिनो मोर्याच्या घरी अनेक मंत्री हे का जातात. त्याच्या घरी एक मंत्र्याची आणि सुशांतची भेट झाली होती आणि तिथून ते पार्टीला गेले होते. ते मंत्री कोण आहे?  अधिकारी त्यांना वाचवायचा प्रयत्न का करत आहे.' असा आरोपच राणेंनी केला होता.

'बाबरी जिंदा है' राम मंदिर भूमिपूजनावर असदउद्दीन ओवेसींचं वक्तव्य

राणे हा आरोप करून एवढ्यावरच थांबले नाही. तर 'सुशांतची मॅनेजर दिशा सलियन होती. तिने आत्महत्या केली. पण या आत्महत्या प्रकरणाचा तपास का झाला नाही. तिचा पोस्टमार्टमचा रिपोर्ट माझ्याकडे आहे. तिने आत्महत्या केली नसून तिची सुद्धा हत्या करण्यात आली आहे. तिच्यावर बलात्कार करून तिला ठार मारण्यात आले आहे. तिच्या गुप्तांगात जखमा आहे, त्यावरून तिचा बलात्कार  झाला आहे, असा गंभीर आरोपही नारायण राणे यांनी केला होती.

त्याचबरोबर, सुशांतची आत्महत्या नसून ही हत्याच आहे. पोलीस योग्य दिशेनं तपास करत नाही. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी अजून एफआय आर दाखल केला नाही. पण बिहारमध्ये दाखल झाला आहे. गेल्या 50 दिवसात आरोपींचा शोध मुंबई पोलिसांनी का लावला नाही' असा सवाल राणेंनी उपस्थितीत केला होता.

'हे तर गलिच्छ राजकारण...' सुशांत सिंह प्रकरणात आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, या प्रकरणात सोशल मीडियावर आदित्य ठाकरे यांना ट्रोल करण्यात आले होते. त्यामुळे खुद्द आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नाही.  हे गलिच्छ राजकारण आहे. मुंबईतील बॉलिवूड हे महत्त्वाचे क्षेत्र आहे. यामध्ये अनेकांनी चांगले संबंध आहे. आणि त्यात काही गैर नाही. पण याचा चुकीचा अर्थ लावला जात आहे, असं आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केले.

Published by: sachin Salve
First published: August 5, 2020, 11:40 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading