मुंबई, 02 डिसेंबर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिलंय. सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रेची सभा मुलुंडमध्ये झाली. यावेळी त्यांनी भाजप, शिंदे गटासह मनसेवर टीका केली. उठ दुपारी अन् घे सुपारी असा त्यांचा कार्यक्रम असतो अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.
राज ठाकरेंवर बोचरी टीका करताना सुषमा अंधारे यांनी म्हटलं की, "आमच्याकडे एक असा माणूस आहे पठ्ठ्या.. उठ दुपारी अन् घे सुपारी असा त्यांचा कार्यक्रम असतो. याला थोडं बोलेन, त्याला थोडं बोलेन, काही वेळासाठी विचारवंत होईल, मध्येच मिमिक्री कलाकार होईल असा त्यांचा कार्यक्रम असतो."
हेही वाचा : मंत्र्यांना कर्नाटकात पाठवू नका; चंद्रकांत पाटलांच्या दौऱ्याआधी CM बोम्मईचं मोठं वक्तव्य
मुंबईतल्या नेस्को मैदानावर गटाध्यक्षांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावरून तसंच अकार्यक्षमतेवरून निशाणा साधला होता. राज ठाकरेंनी केलेल्या त्या टीकेला सुषमा अंधारे यांनी उत्तर दिलंय .
हेही वाचा : उदयनराजे भाजपसोबत काडीमोड घेणार? उद्या करणार भूमिका स्पष्ट
अचनाक गुहेतून बाहेर येतात, अचानक सभा घेतात. त्यानतंर पुन्हा पुढच्या निवडणुकीलाच येतात. दोनच मुद्दे मांडा पण व्यवस्थीत मांडा असा खोचक सल्लाही सुषमा अंधारे यांनी दिला. मी यालाही थोडं बोलेन, त्यालाही बोलेन, मधेच मी विचारवंत होईल, मिमिक्री आर्टिस्ट होईन, मधेच पेंटर होऊन आणि त्यावरून मी कुणीतरी मोठा आहे असं लोक समजतील. भावाच्या आजारपणावर बोलणाऱ्या आणि चेष्टा करणाऱ्या नेत्यावर काय बोलू असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra politics, Mumbai, Raj raj thackeray, Shivsena, Uddhav tahckeray