Home /News /maharashtra /

anil deshmukh and nawab malik : अनिल देशमुख, नवाब मलिकांना फ्लोअर टेस्टला मतदानाचा अधिकार मिळणार?

anil deshmukh and nawab malik : अनिल देशमुख, नवाब मलिकांना फ्लोअर टेस्टला मतदानाचा अधिकार मिळणार?

राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी आदेश दिले आहे. पण, आता महाविकास आघाडी सरकार (mahavikas aghadi sarkar) आणि शिवसेनेनं (shiv sena) सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

  मुंबई, २९ जून : महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) राजकीय नाट्याला नवे वळण येत आहे. राज्यपालांनी (Governor Bhagat Singh Koshyari) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी आदेश दिले आहे. पण, आता महाविकास आघाडी सरकार (mahavikas aghadi sarkar) आणि शिवसेनेनं (shiv sena) सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यामध्ये अनिल देशमुख (anil deshmulh and nawab malik) आणि नवाब मलिक यांच्यावर ईडीची कारवाई (ed areest) करण्यात आली आहे. दरम्यान ते अटकेत असल्याने राज्यसभा आणि विधानपरिषदेसाठी मतदानाचा अधिकार द्यावा यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

  उद्या होणाऱ्या फ्लोअर टेस्टमध्ये मतदान करण्याची मागणी नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी केली आहे. दरम्यान या याचीकेवर आज संध्याकाळी 5.30 वाजता सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने सहमती दर्शवली आहे.

  हे ही वाचा : एकनाथ शिंदे जादुटोणा करता, तोंडात दाणे वशीकरणाचे, खैरेंचा खळबळजनक आरोप

  यापूर्वी अनिल  देशमुख आणि नवाब मलिक यांनी राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानासाठी परवानगी मागून घेतली होती. परंतु त्यांना परवानगी देण्यात आली नव्हती. यामुळे पुढच्या काही तासात मलिक आणि देशमुखांना उद्या मतदानासाठी परवानगी मिळेल का हे समजणार आहे.

  राज्यपालांच्या पत्रातील महत्त्वाचे मुद्दे

  -राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमात आलेल्या बातम्या चिंताजनक आहेत. 39 आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असे सविस्तर वृत्तांकन या माध्यमांनी केले आहे.

  -7 अपक्ष आमदारांचा ईमेल राजभवनाला 28 जून रोजी मिळाला आहे. या ईमेलमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहातील बहुमत गमावले असून लवकरात लवकर विधानसभेचे अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे.

  -विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यांनी 28 जून रोजी माझी भेट घेतली. त्यांनी मला राज्यातील परिस्थितीची माहिती दिली.मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बहुमत गमावल्याचा दावा त्यांनी केला आहे.

  हे ही वाचा : महाविकास आघाडीत 'ऑल इज वेल' नाही! शिवसेनेमुळे वाढली घटकपक्षांची धाकधूक

  -राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून सरकारला सभागृहाचा पाठिंबा आणि विश्वास आहे, याची खात्री करण्याचा मला अधिकार आहे.त्यामुळे मी 30 जून रोजी विशेष अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी बहुमत सिद्ध करावे असे निर्देश देतो.

  - 30 जून रोजी सकाळी 11 वाजता विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे. या अधिवेशनात राज्य सरकारनं बहुमत सिद्ध करावे. विधानसभेचे कामकाज कोणत्याही परिस्थितीमध्ये गुरूवारी संध्याकाळी 5 वाजता समाप्त व्हावे.

  -काही नेत्यांची प्रक्षोभत वक्तव्य लक्षात घेता विधिमंडळाच्या परिसरात पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात यावी

  -विधिमंडळाच्या कामकाजाचे प्रक्षेपण लाईव्ह करण्यात यावे. त्यासंबंधीची सर्व तयारी करावी

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Anil deshmukh, Eknath Shinde, Nawab malik, Supreme court, Uddhav Thackeray (Politician)

  पुढील बातम्या