Home /News /mumbai /

महाविकास आघाडीत 'ऑल इज वेल' नाही! शिवसेनेमुळे वाढली घटकपक्षांची धाकधूक

महाविकास आघाडीत 'ऑल इज वेल' नाही! शिवसेनेमुळे वाढली घटकपक्षांची धाकधूक

राज्यपालांच्या आदेशावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार (Sharad Pawar) यांनी महत्त्वाची बैठक त्यांच्या निवावस्थानी बोलावली होती.

    मुंबई, 29 जून : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाण्याचा आदेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी दिला आहे. उद्या (गुरूवार) विधानसभेत या परीक्षेला ठाकरे सरकारला सामोरं जायचं आहे. राज्यपालांनी दिलेल्या या आदेशानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय. सर्व बंडखोर आमदार गुरूवारी मुंबईत येणार असल्याचं त्यांचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिलीय. तर भाजपानंही त्यांच्या सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. विरोधी पक्ष कामाला लागलेला असतानाच महाविकास आघाडीची धाकधूक वाढली आहे. राज्यपालांच्या आदेशावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार (Sharad Pawar) यांनी महत्त्वाची बैठक त्यांच्या निवावस्थानी बोलावली होती. या बैठकीला शिवसेनेते नेते अनुपस्थित होते. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षात धाकधूक वाढली. शिवसेनेचा एकही नेता बैठकीत उपस्थित नसल्याने महाविकास आघाडी मधील नेत्यांची धाकधूक वाढली. उद्धव ठाकरे आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा तर देणार नाही असा संशय दोन्ही पक्षाच्या नेत्याकडून व्यक्त केला जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती. ते फेक पत्र खरं ठरलं, राज्यपालांनी ठरल्याप्रमाणेच दिले आदेश शिवसेना सर्वोच्च न्यायालयात महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेनं राज्यपालांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.राज्यपालांनी अवघ्या काही तासांमध्ये नोटीस बजावली आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी हा वेळ अत्यंत कमी आहे. यावेळेत आमदारांना राज्यातून बोलावण्यास वेळ लागणार आहे, असा दावा सेनेनं केला आहे. तसंच, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असून सुनावणी ११ जुलैला होणार आहे. सजर कोणताही राजकीय पेच निर्माण झाला तर आमच्याकडे या असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने दिला होता, त्यानुसार शिवसेनेनं याचिका दाखल केली आहे.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Shivsena, Uddhav thackeray, शरद पवार. sharad pawar

    पुढील बातम्या