जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / एकनाथ शिंदे जादुटोणा करता, तोंडात दाणे वशीकरणाचे, खैरेंचा खळबळजनक आरोप

एकनाथ शिंदे जादुटोणा करता, तोंडात दाणे वशीकरणाचे, खैरेंचा खळबळजनक आरोप

एकनाथ शिंदे जादुटोणा करता, तोंडात दाणे वशीकरणाचे, खैरेंचा खळबळजनक आरोप

रिक्षावाला करोडपती होतो ; याला ED का लागत नाही 7 कोटीचा फ्लॅट घेतला तर ED चौकशी करते,आमच्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांची पण ED चौकशी होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

औरंगाबाद, 29 जून : एकनाथ शिंदे जादूटोणा करणारा माणूस आहे. एकनाथ शिंदे यांनी वशीकरण करून जादूटोणा करून आमदाराना खाऊ पिऊ घालून गुंग केले. त्यांच्या तोंडामध्ये असणारे दाणे हे जादूटोण्याचे असतात’ असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी केला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे. सेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर टीका करत आहे. अशातच चंद्रकांत खैरेंनी खळबळजनक टीका केली आहे. जालन्यात आयोजित शिवसेनेच्या समर्थन व निषेध रॅली मध्ये शिवसेना उपनेते चंद्रकांत खैरे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आपल्या भाषणातून खैरे यांनी एकनाथ शिंदेवर घणाघात केलाय. ‘तो जादूटोणा करणारा माणूस तो चालवत होता रिक्षा, आता त्याला जनता देईल शिक्षा मोर्चा मधील एका शिवसैनिकाच्या हातातील या घोषणा फलकाचा संदर्भ देत खैरेंनी आपल्या भाषणाची सुरवात केली. एकनाथ शिंदे हा जादूटोणा करणारा माणूस असल्याचा गौफयस्फोट खैरेंनी केलाय. एवढच नव्हे खोटं वाटतं असेल तर लक्ष देऊन बघा, बैठकीला बसण्यापूर्वी तो तोंडात काही तरी पाने वगैरे टाकतो आणि मग ती बैठक यशस्वी होते असं ही खैरे म्हणाले. “महाराष्ट्रात ये दाखवतो, रस्त्यावर फिरू देणार नाही जालन्यातील शिवसैनिकांनी उध्दव ठाकरेंचा सर्थनार्थ मराठवाड्याचा आवाज बुलंद केला. गुवाहाटी मध्ये बसलेले गद्दार आपल्याला टिव्हीवर पहात असतील त्यांना दुसरं काही काम नाही. तुम्ही महाराष्ट्रात या मग दाखवतो, रस्त्यावर फिरू देणार नाही असा धमकीवजा इशारा खैरेंनी एकनाथ शिंदेसह बंडखोर आमदारांना दिला. “बंडखोर आमदारांना 7 हजार कोटी रुपये दिले गुवाहाटीमध्ये त्यांचं विमानाचं बिल, हॉटेलचा बोलणे सर्व खर्च कोण करतोय, तो टरबूज्या. या बंडखोर आमदारांना तब्बल 7 हजार कोटी रुपये देण्यात आले असून खोटं वाटत असेल संघातील आपल्या एखाद्या मित्राला विचारा, असं आरोप खैरेंनी केला. रिक्षावाला करोडपती होतो ; याला ED का लागत नाही 7 कोटीचा फ्लॅट घेतला तर ED चौकशी करते,आमच्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांची पण ED चौकशी होते. रिक्षा चालवणारा एकनाथ शिंदे आज करोडपती कसं काय. याला ED का लागत नाही, असा खोचक सवाल खैरे यांनी उपस्थित केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात