सांगली, 19 ऑक्टोबर : जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राज्याचं गृहमंत्रिपद (Home Minister post) नाकारलं असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दोन दिवसांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमात सांगितलं होतं. यावर आता स्वत: जयंत पाटील यांनी भाष्य करुन गृहमंत्रिपद का नाकारलं याचं कारण सांगितलं आहे. डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता आणि म्हणून मी गृहमंत्रिपद नाकारलं असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. गृहमंत्री झाल्यावर ब्लडप्रेशर आणि शुगरचा त्रास सुरू होतो, हे आपणाला आर आर आबा पाटील यांनी सांगितले होते, आणि गृहमंत्री झाल्यानंतर आपल्याला ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झाला. त्यांनतर आपण शुगर मागे लागू नये,अशी भूमिका घेतली असा खुलासा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. तसेच पोलिसांनी आता ज्यादा अधिकार देण्या बरोबर त्यांच्यावरील तणाव कमी करण्याचे प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मतही मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. सांगलीतील पोलीस मुख्यालयातील नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. काय म्हणाले होते अजित पवार? गृहखात्याच्या जबाबदारीवरून अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात जोरदार टोलेबाजी केली. ‘गृहखातं देत असताना अनेकांना विचारलं. त्यात जयंत पाटलांना साद घातली. पण गृहमंत्रिपद म्हटलं कि माझा बीपी वाढतो. आपल्याला अशा व्याधी होऊ नये म्हणजे बरं’ असं म्हणता अजितदादांनी चांगलीच फटकेबाजी केली. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील विविध वविकास कामांसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. यावेळी बोलत असताना अजितदादांनी गृहमंत्रिपदाची जबाबदारी कशा प्रकारे टाळली असा किस्साच सांगून टाकला. ‘गृहखातं देत असताना अनेकांना विचारलं. त्यात जयंत पाटलांना साद घातली. पण गृहमंत्रिपद म्हटलं कि माझा बीपी वाढतो. त्यानंतर ह जयंत पाटलांनी जबाबदारी ढकलली. नंतर ही जबाबदारी वळसे पाटलांनी स्वीकारलीत. आपल्याला अशा व्याधी होऊ नये म्हणजे बरं. असं म्हणत गृहमंत्रिपदावरून वळसेपाटलांसमोरच अजित पवारांची फटकेबाजी केली. पवारांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर राष्ट्रवादीतून चंद्रकांत पाटलांवर घणाघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आपल्या विधानामुळे कायम चर्चेत असतात. आताही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. ‘सत्ता गेली की कोणा भ्रमिष्ट होतं,तर कोणाचा तोल जातो, त्यामुळे चंद्रकांत पाटलांचे यापैकी काय झालंय, याचे संशोधन कराव लागेल, असा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘सत्ता गेल्यावर काही लोक भ्रमिष्ट होतात. तर काहींचे तोल जातो, त्यामुळे आता चंद्रकांतदादांचा यापैकी नेमकं काय झालं याचं संशोधन करावे लागेल, असा टोलाही पाटील यांनी लगावला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







