आंबेगाव, 15 ऑक्टोबर : राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) आपल्या तडाखेबाज भाषणासाठी नेहमी ओळखले जातात. गृहखात्याच्या जबाबदारीवरून अजित पवारांनी आंबेगाव इथं झालेल्या कार्यक्रमात जोरदार टोलेबाजी केली. 'गृहखातं देत असताना अनेकांना विचारलं. त्यात जयंत पाटलांना साद घातली. पण गृहमंत्रिपद म्हटलं कि माझा बीपी वाढतो. आपल्याला अशा व्याधी होऊ नये म्हणजे बरं' असं म्हणता अजितदादांनी (ajit pawar) चांगलीच फटकेबाजी केली.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील विविध वविकास कामांसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. यावेळी बोलत असताना अजितदादांनी गृहमंत्रिपदाची जबाबदारी कशा प्रकारे टाळली असा किस्साच सांगून टाकला.
'गृहखातं देत असताना अनेकांना विचारलं. त्यात जयंत पाटलांना साद घातली. पण गृहमंत्रिपद म्हटलं कि माझा बीपी वाढतो. त्यानंतर ह जयंत पाटलांनी जबाबदारी ढकलली. नंतर ही जबाबदारी वळसे पाटलांनी स्वीकारलीत. आपल्याला अशा व्याधी होऊ नये म्हणजे बरं. असं म्हणत गृहमंत्रिपदावरून वळसेपाटलांसमोरच अजित पवारांची फटकेबाजी केली.
पवार कुटुंबीयांच्या नव्या पिढीचं सीमोल्लंघन, रोहित पवारांच्या 'हाती' भगवा ध्वज!
'घोडेगावात कोरोना लसीकरण उपलब्ध आहे. त्याचा फायदा उठवला पाहिजे. अने जण म्हणतात कशाला टोचून घ्यायचे. मात्र काळजी घेतली पाहिजे बाबांनो, कोरोना अजून काही गेला नाही. आज प्रत्येकाला वाटत मुदत संपायच्या आत माझं नाव लागलं पाहिजे. हा मानवी स्वभाव आहे. लग्नाच्या पत्रिकेत नाव लागत तेवढंच', असं म्हणत अजितदादांचा मुदत संपणाऱ्या पंचायत समिती सदस्यांना टोला लगावला.
'पंचायत समितीच्या सदस्यांनी सांगितलं. आम्हाला नुसतं पोस्टमनचं काम करावं लागतं. आमचेही अधिकार वाढवा ना. पंचायत समितीच्या सदस्यांना पण अधिकार देण्याचा आम्ही प्रयत्न करू. राज्यातील कोणतीही शासकीय इमारत जनतेच्या पैशातून उभी राहत असते. इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी याची जाण ठेवावी', असा सल्लाही अजितदादांनी दिला.
Hotness Alert! निया शर्माने पुन्हा दाखवला बोल्ड अंदाज; वेस्टर्न ड्रेसमध्ये.....
'आम्ही सगळे 3 पक्ष मिळून काम करतोय त्यात कोरोना सारख संकट आलं. त्यामुळे उत्पन्नावर परिणाम झाला या सगळ्यात तारणहार ठरला फक्त बळीराजा. आज शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आले आहे, त्यांना मदत देण्यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे, असंही अजित पवार म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.