Home /News /maharashtra /

पवारांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर राष्ट्रवादीतून चंद्रकांत पाटलांवर घणाघात, जयंत पाटील म्हणाले...

पवारांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर राष्ट्रवादीतून चंद्रकांत पाटलांवर घणाघात, जयंत पाटील म्हणाले...

'सत्ता गेल्यावर काही लोक भ्रमिष्ट होतात. तर काहींचे तोल जातो, त्यामुळे आता चंद्रकांतदादांचा यापैकी नेमकं काय झालं'

'सत्ता गेल्यावर काही लोक भ्रमिष्ट होतात. तर काहींचे तोल जातो, त्यामुळे आता चंद्रकांतदादांचा यापैकी नेमकं काय झालं'

'सत्ता गेल्यावर काही लोक भ्रमिष्ट होतात. तर काहींचे तोल जातो, त्यामुळे आता चंद्रकांतदादांचा यापैकी नेमकं काय झालं'

सांगली, 19 ऑक्टोबर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) आपल्या विधानामुळे कायम चर्चेत असतात. आताही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.  'सत्ता गेली की कोणा भ्रमिष्ट होतं,तर कोणाचा तोल जातो, त्यामुळे चंद्रकांत पाटलांचे यापैकी काय झालंय, याचे संशोधन कराव लागेल, असा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील (jayant patil) यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते. 'सत्ता गेल्यावर काही लोक भ्रमिष्ट होतात. तर काहींचे तोल जातो, त्यामुळे आता चंद्रकांतदादांचा यापैकी नेमकं काय झालं याचं संशोधन करावे लागेल, असा टोलाही  पाटील यांनी लगावला आहे. VIDEO - ट्रेनखाली जाणार होती प्रेग्नंट महिला, जवानाने मृत्यूच्या दारातून खेचूलं तसंच, 'शरद पवार त्यांचे बोट धरून आपण राजकारणात आलो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात. त्यामुळे चंद्रकांतदादा यांनी खाजगीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत एकेरी भाषा वापरली असेल, असे मत मंत्री पाटील यांनी व्यक्त केलं आहे. चंद्रकांत पाटलांची सारवासारव दरम्यान, नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी सारवासारव केली आहे. 'पुण्यामध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना, शरद पवार यांच्याबद्दल चुकून बोललो.  शरद पवार साहेबांबद्दल माझ्या मनात आदर आहे. मी कधीही त्यांचा अनादर केला नाही. मुळात तो एक छोट्या कार्यक्रम होता. भाजपच्या विजयी उमेदवारांचा सत्काराचा कार्यक्रम होता. मोजकेच भाजपचे कार्यकर्ते उपस्थितीत होते, अशी सारवासारव चंद्रकांत पाटील यांनी केली. मी याआधी शरद पवार यांच्याबद्दल अनेकवेळा चांगलं बोललो आहे, मी त्यांची प्रशंसा केली आहे. प्रमोद महाजन यांनी त्यांच्याबद्दल आम्हाला सांगितलं आहे, राजकारणाचा त्यांचा अनुभव खूप मोठा आहे, त्यांच्याबद्दल टीव्हीवर अनेक वेळा चांगलं बोललो आहे, त्यांच्याही व्हिडीओ क्लिप बघाव्या, असंही पाटील म्हणाले. Shocking! सावत्र मुलीसोबत मांडला तिसऱ्यांदा संसार; मात्र लग्नाचा भयावह शेवट 'एका वाक्याचा इतका बाऊ संजय राऊत यांनी करू नये. मी जर  उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोललो तर राऊत यांनी बोलावं. पण याचा अर्थ पवार साहेब हे राऊत यांचे सर्वेसर्वा आहेत, उद्धव ठाकरे नाहीत, असा चिमटा देखील चंद्रकांत पाटील यांनी काढला.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Jayant patil, NCP

पुढील बातम्या