मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Life@25 : वयाच्या 14 व्या वर्षी लग्न, 18 व्या वर्षात दोन मुलं, मुंबईच्या धडाकेबाज IPS अधिकारी एन. अंबिका यांची प्रेरणादायी कहाणी

Life@25 : वयाच्या 14 व्या वर्षी लग्न, 18 व्या वर्षात दोन मुलं, मुंबईच्या धडाकेबाज IPS अधिकारी एन. अंबिका यांची प्रेरणादायी कहाणी

आयपीएस एन. अंबिका

आयपीएस एन. अंबिका

एन. अंबिका यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर अतिशय सर्वधारण घराण्यातील महिला. त्याचं वयाच्या अवघ्या 14 वर्षी लग्न झालं होतं. त्या गृहिणी होत्या. विशेष म्हणजे वयाच्या 18 व्या वर्षी त्या दोन मुलांच्या आई बनल्या होत्या. पण त्यांच्या आयुष्यात असं काहीसं घडलं की त्यांना आयपीएस अधिकारी व्हावसं वाटलं.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Chetan Patil

मुंबई, 1 सप्टेंबर : काही जणांचा संघर्ष खूप काही शिकवणारा असतो. तो संघर्ष वाचताना त्यामध्ये कधीकधी आपल्याला आपल्याच जवळची आजूबाजूची माणसं डोळ्यांसमोर उभी राहिलेली दिसतात. काहीवेळा तर त्या संघर्षातला जो मुख्य व्यक्ती असतो तो कदाचित आपणच आहोत की काय? असा भासही होतो. अशा संघर्षकथा आपल्याला खूप प्रेरित करतात. आपणही मोठं काहितरी करु शकतो, आपणही अधिकारी बनू शकतो, आपल्याला हवं असणारं यश आपणही मिळवू शकतो, असा आत्मविश्वास या संघर्षकथांमधून मिळतो. आपल्याला जे यश मिळवायचं आहे, त्यासाठी खूप अडचणी असतात. ते आपल्याला ठावूक असतं. पण तरीही अशा संघर्षमय आणि प्रेरक कथा ऐकून आपण खूप उत्साही होतो. जगातील सर्व अडचणी या उत्साहापुढे फिक्या असतात. कोणतंही संकट किंवा अडचणी येवू दे, आपण त्यावर मात करुन जिंकणारच असा विश्वास काही प्रेरणादायी व्यक्तीमहत्त्वांकडे बघून मिळतो. आम्ही आज अशाच एका प्रेरणादायी महिला आयपीएस अधिकाऱ्याची कहाणी सांगणार आहोत. ही महिला अधिकारी म्हणजे आयपीएस अधिकारी एन. अंबिका!

एन. अंबिका यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर अतिशय सर्वधारण घराण्यातील महिला. त्याचं वयाच्या अवघ्या 14 वर्षी लग्न झालं होतं. त्या गृहिणी होत्या. विशेष म्हणजे वयाच्या 18 व्या वर्षी त्या दोन मुलांच्या आई बनल्या होत्या. पण त्यांच्या आयुष्यात असं काहीसं घडलं की त्यांना आयपीएस अधिकारी व्हावसं वाटलं. त्यांनी फक्त महत्त्वकांक्षी म्हणून आयपीएस होण्याचं स्वप्न पाहिलं नाही तर त्यांनी ती महत्त्वकांक्षा वास्तव्यात साकार करुन दाखवली म्हणून त्या आजच्या तरुणांसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. विशेष म्हणजे अंबिका यांनी तीनवेळा अपयशही पचवलं. पण त्या मेहनत करत राहिल्या आणि यशस्वी झाल्या. आज तडफदार पोलीस अधिकाऱ्यांमध्ये एस. अंबिका यांचं नाव घेतलं जातं.

एन. अंबिका या मूळच्या तामिळनाडूच्या आहेत. त्यांचा वयाच्या 14 वर्षी एका पोलीस कॉन्स्टेबलसोबत विवाह झाला होता. त्यानंतर वयाच्या 18 व्या वर्षी त्या दोन मुलांच्या आई बनल्या होत्या. लग्न लवकर झाल्याने ते आपलं शालेय शिक्षण देखील पूर्ण करु शकल्या नव्हत्या. त्या आपलं घर आणि संसारात व्यस्त होत्या. त्यामध्ये त्या खूश देखील होत्या. त्यावेळी त्यांच्या मनात आपण आयपीएस व्हावं, असा विचार देखील तेव्हा आला नव्हता. पण अचानक त्यांच्या आयुष्यात असं काही घडलं की त्यांच्या मनात आयपीएस होण्याची प्रेरणा जागृत झाली.

(Life@25 : सलाम! दारु विकणाऱ्यांचा मुलगा कलेक्टर, भील समाजाच्या तरुणाची हुंदका दाटून आणणारी कहाणी)

एन. अंबिका यांनी एका मुलाखतीत आयपीएस होण्यासाठी प्रेरणा नेमकी कुठून मिळाली याबाबत माहिती दिली आहे. अंबिका एकदा आपल्या कॉन्स्टेबल पतीसोबत 26 जानेवारीला गणराज्य दिनाच्या दिवशी पोलीस परेड पाहण्यासाठी गेल्या होत्या. तिथे त्यांनी आपल्या पतीला एका बड्या पोलीस अधिकाऱ्याला सॅल्यूट करताना पाहिलं. घरी आल्यानंतर अंबिका यांनी आपल्या पतीला त्याबाबत माहिती विचारली तेव्हा त्यांनी आपण आयपीएस अधिकाऱ्याला सॅल्यूट केल्याची माहिती पतीने दिली. यावेळी पतीने आयपीएस कसं होता येतं, त्यासाठी काय-काय करावं लागतं, अधिकारी झाल्यावर कसा सन्मान मिळतो? याबाबतची सविस्तर माहिती अंबिका यांना दिली. त्यानंतर अंबिका यांनी यूपीएससीची परीक्षा देण्याचा निर्धार केला.

आपल्या पतीकडून आयपीएस होण्यासाठी काय-काय तयारी करावी लागते याबाबतची माहिती मिळवल्यानंतर अंबिका यांनी आपलं थांबलेलं शालेय शिक्षण पुन्हा सुरु केलं. त्यांनी एका प्रायव्हेट कोचिंग क्लासच्या मदतीने 10 ची परीक्षा दिली. त्यामध्ये त्या चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर डिस्टन्स लर्निंगच्या माध्यमातून त्यांनी 12 वी आणि पदवीधर शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर अंबिका यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली.

अंबिका आपल्या परिवारासह डिंडीगुल येथे राहत होते. पण तिथे यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी कोचिंग सेंटर नव्हतं. त्यामुळे अंबिका चेन्नईला गेल्या. या कळात त्यांच्या कुटुंबियांनीदेखील त्यांना चांगलं सहकार्य केलं. अंबिका परीक्षेची तयारी करत होत्या तेव्हा त्यांच्या पतीने आपल्या नोकरीसह मुलांनादेखील सांभाळलं.

(नियतीने नेत्र हिरवले, मनाने दुनिया पाहिली, डोळ्यांमधून टचकन पाणी आणणारी IAS प्रांजल पाटील यांची कहाणी)

अंबिका यांनी यूपीएससी परीक्षेसाठी प्रचंड मेहनत घेतली. पण तरीही त्यांना सुरुवातीला यश मिळत नव्हते. त्यांना लागोपाठ तीनवेळा अपयश आलं. त्यामुळे त्यांच्या कुटुबियांनीदेखील त्यांना परत घरी येण्यास सांगितलं. पण अंबिका हट्टी होत्या. त्यांनी आयपीएस होण्याचं मनाशी ठाम केलेलं होतं. त्यामुळे त्यांनी आपल्या पतीला शेवटची संधी द्या, अशी विनवणी केली. त्यांच्या पतीने त्यांचं म्हणणं ऐकलं आणि आणखी एक संधी दिली. याच संधीचं अंबिका यांनी सोनं करुन दाखवलं.

अंबिका यांनी 2008 साली चौथ्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली. त्यांनी जीव ओतून मेहनत घेतली. अखेर त्यांच्या या मेहनतीचं चीज झालं आणि त्या यशस्वी झाल्या. एन. अंबिका यांना महाराष्ट्र कॅडरमध्ये पोस्टिंग मिळाली. अंबिका सध्या मुंबई पोलीस खात्या उच्च पदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

First published:

Tags: IPS Officer, Upsc