मध्यरात्रीपासून टोलवसुली बंद, माल वाहतूक करणाऱ्या वाहनांबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.

  • Share this:
    मुंबई, 29 मार्च: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिपत्याखालील टोल नाक्यांवर माल वाहतूक (good transport)करणाऱ्या वाहनांवर आकारण्यात येणारी टोल वसुली रविवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून बंद करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने चाबाबतची अधिसूचना जारी केली आहे. हेही वाचा.. शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे कोरोना रुग्णालयात रुपांतर, संख्या वाढल्याने निर्णय सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 29 मार्च 2020 रोजी मध्यरात्री 12 वाजल्यापासून टोल वसुलीस स्थगिती देण्यात आली आहे. टोलवसुलीच्या स्थगितीचे हे आदेश पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत अंमलात राहतील, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने कळवले आहे. हेही वाचा...महाराष्ट्रावर आता आणखी एका आजाराचं सावट, स्वत: मुख्यमंत्र्यांनीच व्यक्त केली भीत महाराष्ट्रात 1 लाख लोकांना मिळणार 5 रुपयांमध्ये जेवण दुसरीकडे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळीचा विस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आजपासूनच याबाबतची अंमलबजावणी सुरू होणार आहे. शिवभोजन थाळीच्या वेळेत वाढ केली असून आता 11 ते 3 या वेळेत हे भोजन दिलं जाईल. याअंतर्गत रोज 1 लाख लोकांना शिवभोजन दिल जाईल. तसंच ही थाळी आता 10 ऐवजी फक्त 5 रुपयांत मिळणार आहे. 3 महिन्यांकरता ही सवलत असेल,' अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. हेही वाचा...BREAKING: कोरोनाचा विदर्भात पहिला बळी, बुलडाण्यात 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 'शिवभोजन थाळीसाठी 45 रुपये सरकार कडून थाळी केंद्राला दिले जातील. ग्रामीण मध्ये 30 रुपये दिले जातील. 1 एप्रिल ऐवजी ताबडतोब आजच्या आज ही योजना सुरू होणार आहे. शिवभोजन थाळीच्या 5 पट भोजन थाळ्या वाढवून दिलेल्या आहेत. लोकांनी नाशिकमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये. गर्दी झालेली असेल तर त्याबाबत तात्काळ कारवाई करत आहेत,' असंही छगन भुजबळ म्हणाले.
    First published: