महाराष्ट्रावर आता आणखी एका आजाराचं सावट, स्वत: मुख्यमंत्र्यांनीच व्यक्त केली भीती

महाराष्ट्रावर आता आणखी एका आजाराचं सावट, स्वत: मुख्यमंत्र्यांनीच व्यक्त केली भीती

'ही आणीबाणीची स्थिती आहे. वर्दळ ताबडतोब थांबवा.'

  • Share this:

मुंबई, 29 मार्च : 'ही आणीबाणीची स्थिती आहे. वर्दळ ताबडतोब थांबवा. सर्व डॉक्टर आणि त्यांच्या टीमला मानाचा मुजरा करतो. डॉक्टरांशी बोलल्यावर माझं धेर्य वाढत आहे. आपण टप्पा टप्याने पुढे चाललोय. हा जीवघेणा खेळ आहे. बरेच पॉझिटिव्ह पेशंट बरे होत आहेत. मात्र आता न्युमोनियाचे पेशंट वाढण्याची शक्यता आहे,' अशी भीती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

या रोगाला आपण पहिल्या पायरीवरच रोखत आहोत. काही लोकं कॉरन्टाईन आहेत त्यांची इतरांनी काळजी घ्या आणि लक्ष ठेवा. गरोदर महिला आणि वरिष्ठ नागरिकांना विविध आजार असतील तर त्यांना जपलं पाहीजे. गुणाकाराचा काळ जो आहे तो हाच आहे... आणि याच काळात आपल्याला या रोगाची वजाबाकी करायची आहे. आपल्याकडे औषधांचा तुटवडा नाही. मोठी दुर्घटना घडेल असं काही करू नका. ही जिद्द आणि हा संयम कायम ठेवा. सरकारला कठोर पावलं उचलायला लावू नका. घरातच राहा आपल्याला ही लढाई जिंकायची आहे,' असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दिलासा दिला आहे. तसंच आभारही व्यक्त केले आहेत. 'आपणा सर्वांना धन्यवाद देतो. आपण सर्व सूचनांचं पालन करत आहात. तुम्ही सर्वजण माझ्या सोबत आहात. विरोधी पक्षही माझ्या सोबत आहे. राजही मला फोन करून दिलासा आणि सूचना देत आहे,' अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

'आपली टीम आता चांगली तयार झाली आहे. सर्व देशातील आणि राज्यातील कामगार त्यांच्या देशात जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी जिथे आहात तिथेच थांबा. या सर्वांना जेवणाची आणि राहाण्याची आपण व्यवस्था करतोय. यासाठी राज्यात 163 ठिकाणी केंद्र सुरू करत आहोत,' असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

'जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 24 तास उघडी ठेवण्याची निर्णय घेतला आहे. तरी देखील काही लोक बाहेर पडत आहेत. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे विनाकारण बाहेर येऊ नका घरातच राहा. पंतप्रधान मोदी माझ्याशी बोलत आहेत. अमित शहा आणि जावडेकरदेखील माझ्याशी बोलत आहेत,' असा खुलासा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

First published: March 29, 2020, 5:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading