शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे थेट कोरोना रुग्णालयात रुपांतर, रुग्णांची संख्या वाढल्याने घेतला निर्णय

शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे थेट कोरोना रुग्णालयात रुपांतर, रुग्णांची संख्या वाढल्याने घेतला निर्णय

कोरोना तपासणीसाठी येत्या तीन ते चार दिवसात तपासणी केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे.

  • Share this:

मिरज, 29 मार्च : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे 24 करोना बाधित रुग्ण आढळून आल्याने याची गांभीर्याने दखल घेऊन मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे कोरोना रुग्णालयात रुपांतर करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.

इस्लामपूर येथे अचानकपणे वाढलेल्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात येताच मुंबईतील जे.जे. समूह रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली. डॉ. पल्लवी सापळे यांनी तातडीने मिरज येथे भेट देऊन मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे तातडीने 300 खाटांच्या करोना रुग्णालयात रुपांतर केले आहे यात पंधरा आय.सी.यू . बेड, सिटी स्कॅन एम.आर.आय. या सुविधाही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कोरोना तपासणीसाठी येत्या तीन ते चार दिवसात तपासणी केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे.

मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील सर्व रेसिडेंट डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ. वाहन चालक व अन्य कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्याचे काम आजपासून सुरू करण्यात आले आहे. येत्या आठवडाभरात हे प्रशिक्षण पूर्ण करण्यात येईल येईल असेही अमित देशमुख यांनी सांगितले आहे.

अवघ्या 2 वर्षांच्या मुलाला झाला कोरोना

सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा आत्ता 24 वर गेला आहे. एकाच कुटुंबातील अनेकांना कोरोनाचा विळखा पडला आहे. नुकताच कोरोना पॉझिटिव्ह आलेला 2 वर्षांचा मुलगा त्याच कुटुंबातील असून यापूर्वी देखील या घरातील लहान मुलांचे रिपोर्ट पाठवण्यात आले होते. मात्र त्यावेळी ते निगेटिव्ह होते. काल तिघांचे रिपोर्ट पाठवले त्यात एका मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

First published: March 29, 2020, 5:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading