बुलडाणा, 29 मार्च: राज्यात कोरोनाबाधित मृतांचा आकडा वाढला आहे. विदर्भात कोरोना व्हायरसने पहिला बळी घेतला आहे. बुलडाण्यात एका 45 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आता राज्यात कोरोनामुळे मृतांची संख्या 8 झाली आहे.
बुल़डाण्याचे जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिलेली माहिती अशी की, जिल्हा रुग्णालयात एकाचा व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, घाबरू नका, घरातच राहा, सुरक्षित राहा, असं आवाहन केले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या आयशोलेशन वॉर्डात शनिवारी या रुग्णाचा मृत्यू झाला. मृत कोरोना रुग्ण हा न्यूमोनिया झाला म्हणून रुग्णालयात झाला होता. त्याच्यावर उपचार सुरु होते. रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
हेही वाचा..डोंबिवलीत कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ, टेस्टिंग लॅब सुरू करा, मनसेची मागणी
दरन्यान, रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच प्रशासनाने रुग्णाचे नातेवाईकांची तपासणीसाठी त्यांचे घर गाठले आहे. सर्वाना क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या रुग्णाच्या जे कोणी संपर्कात आले त्यांचाही शोध घेत असून उल्लेखनीय म्हणजे शनिवारी या रुग्णाच्या अंत्यविधीला शंभर ते दीडशे नागरिक उपस्थित होते.
हेही वाचा..उद्धव ठाकरेंचा शिलेदार! आईचा दशक्रिया विधी न करताच विकास खारगे मंत्रालयात हजर
या रुग्णाला बाहेरदेशाची काही हिस्ट्री जरी नसली तरी पॉझिटिव्ह कसा निघाला यचायी शोध प्रशासन घेत आहे . आता ज्या भागात तो राहत होता त्याठिकाणी सुद्धा सील करण्याचा निर्णय घेणार आहेत. आता बुलडाणा शहर सुद्धा एक्टिव्ह सर्व्हिलन्समध्ये घेतले आहे. तर नागरिकांनी बाहेर न निघण्याचे प्रशासनाचे आवाहन केलं आहे.
हेही वाचा..कोरोनाबाधितांच्या मदतीला धावला गरीबांचा 'विठ्ठल', सहाय्यता निधीला दिले 1 कोटी
धक्कादायक म्हणजे देशात कोरोनाबाधित रुग्णांची सर्वाधित संख्या महाराष्ट्रात आहे. दरम्यान, रविवारी सकाळी मुंबईत एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला होता. या महिलेवर मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार सुरु होते. कोरोना व्हायरसने आता देशात चांगलेच हातपाय पसरले आहेत. त्यात राज्यातील परिस्थिती आणखी भयंकर होत चालली आहे. कारण आता राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दोनशेच्या जवळ पोहचली आहे.
देशातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात...
देशभरात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या आज 193 वर पोहोचली आहे. पुण्यात 1, मुंबईत, 4 सांगलीमध्ये 1 तर नागपुरात 1 असे नवीन 7 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
मुंबईमध्ये 108 रुग्णांची शनिवारी नोंद करण्यात आली होती. मात्र दिवसेंदिवस वाढणाऱ्या या आकड्यांमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. संपूर्ण देशात कोरोनाचं संक्रमण टाळण्यासाठी लॉकडाऊनचे आदेश असतानाही अनेक जण ते गांभीर्यानं घेत नसल्याचं चित्रही पाहायला मिळत आहे. कोरोनाचे वाढत्या आकड्यांमुळे लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जाणार का, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus symptoms