जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / प्रेग्नेंट महिलांच्या मदतीला धावणारा रिक्षावाला भाऊ, शिवरायांच्या सच्च्या मावळ्याचं होतंय कौतुक, Video

प्रेग्नेंट महिलांच्या मदतीला धावणारा रिक्षावाला भाऊ, शिवरायांच्या सच्च्या मावळ्याचं होतंय कौतुक, Video

प्रेग्नेंट महिलांच्या मदतीला धावणारा रिक्षावाला भाऊ, शिवरायांच्या सच्च्या मावळ्याचं होतंय कौतुक, Video

Auto Rickshaw Driver : पंढरपूरचे ऑटो रिक्षा चालक विष्णू शेटे यांचे सामाजिक काम पाहून तुम्हाला त्यांचा नक्की अभिमान वाटेल.

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

    कोल्हापूर, 30 जानेवारी : रिक्षा चालवणे हा व्यवसाय सध्या बऱ्याच जणांकडून केला जातो. पण या रिक्षा सोबतच आपली विशेष ओळख जपणारे देखील समाजात बघायला मिळतात. पंढरपूरचे विष्णू शेटे हे त्यापैकीच एक रिक्षा चालक आहेत. त्यांनी त्यांची रिक्षा खास पद्धतीनं सजवलीय. त्याचबरोबर सामाजिक भानही जपले आहे. काय आहे वेगळेपण? विष्णू शेटे यांनी 2004 साली पहिली तर 2014 साली दुसरी रिक्षा विकत घेतली. त्यांनी पहिली रिक्षा रॉबिनहून आर्मी या सामाजिक संस्थेला दान केली. तर दुसरी रिक्षा 2022 साली विकून नवीन रिक्षा खरेदी केली होती. शेटे ही रिक्षा आतून आणि बाहेरून सजवून वेगवेगळ्या सौंदर्य स्पर्धेत सहभागी होतात. कोल्हापूरमध्ये नुकत्याच झालेल्या सौंदर्य स्पर्धेतही ते सहभागी झाले होते. रिक्षा चालवताना गोरगरिबांसाठी काही तरी करायला पाहिजे, हा विचार त्यांच्या मनात येत असे. समाजिक कार्य करण्याच्या भावनेनं प्रेरित होऊन विष्णू यांनी  समाजातील गरजू घटकांना मदत करायला सुरुवात केली.एखाद्या गरिब व्यक्तीला स्वतः जवळचे 10 रुपये जरी द्यायचे म्हटले, तरी त्यांना ते खूप असतात. इतर प्रवाशांकडून पैसे घेऊन आनंद मिळविण्यापेक्षा गरिबाला मदत करुन मिळवलेला आनंद खूप मोलाचा आहे, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली. त्याचबरोबर दिव्यांग व्यक्ती तसंच गर्भवती महिलांना मोफत सेवा देण्याचं कामही विष्णू करतात. जगात भारी रिक्षाची सवारी! कोल्हापुरात रंगली नादखुळी सौंदर्य स्पर्धा, Video घरावर उभारला शिवरायांचा पुतळा कोरोना कालावधीत सर्वच सण, उत्सव, जयंती दिन घरीच साजरे करावे लागले होते. त्यावेळी विष्णू यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून स्वत:च्या घरावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 8 फुटी अश्वारुढ पुतळा उभारला होता. छत्रपतींचा हा पुतळा पाहण्यासाठी अनेक शिवभक्त विष्णू यांच्या घरी जातात.

    News18लोकमत
    News18लोकमत

    मदतीला नेहमी पुढे विष्णू शेटे हे सामाजिक उपक्रमांसाठी नेहमी अग्रेसर असतात. कोरोना परिस्थितीमध्ये रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत पोचवण्यासाठी देखील रिक्षातून मोफत सेवा विष्णू यांनी दिली होती. गणेश चतुर्थीवेळी देखील गणपती घरी घेऊन जाण्यासाठी ते मोफत रिक्षा चालवतात. तिरंग्याची शान जपण्यासाठी झटणारा इंजिनिअर, मुंबईकरांमध्येही करतोय जागृती, Video सध्या डिझेल व पेट्रोलचे गगनाला भिडलेले दर हा एक चिंतेचा विषय आहे. त्यानंतरही विष्णू शेटे यांनीया सेवेमध्ये कधी खंड पडू दिलेला नाही. त्यामुळे आजवर त्यांच्या कार्याचे नेहमीच कौतुक होत आलेले आहे. कित्येक ठिकाणी त्यांना सन्मान सत्कार करण्यात आलेला आहे. एक रिक्षा व्यवसायिक असून देखील इतरांची सेवा करणाऱ्या विष्णू यांच्या कार्याचं अनेकांनी कौतुक केलं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात