#autorickshaw

VIDEO: लायसन्स मागितलं म्हणून रिक्षा चालकाने महिला पोलिसाला फरफटत नेलं!

मुंबईOct 10, 2018

VIDEO: लायसन्स मागितलं म्हणून रिक्षा चालकाने महिला पोलिसाला फरफटत नेलं!

कायद्याचे रक्षक असलेल्या पोलिसांना मुजोर रिक्षाचालक कसे शब्दशः फरफटत नेतात हे तुम्हाला दिसेल. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात मुजोर रिक्षाचालकांचा विळखा वाढलाय. या मुजोरखोर रिक्षा चालकांची मजल आता वाढतच चालली आहे. कारण एका रिक्षा चालकाने थेट महिला वाहतूक पोलिसालाच फरफटत नेलं. या महिला वाहतूक पोलिसानं रिक्षाचालकाकडे लायसन्स मागितलं म्हणून लायसन्स न देता अरेरावी करणाऱ्या रिक्षाचालकानं महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला अक्षरशः फरफटत नेलं. आशा गावंडे असं जखमी महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. याप्रकरणी नागेश अवालगिरी या रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

Live TV

News18 Lokmat
close