मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अर्धवट कामामुळे पुलाचा अंदाजच आला नाही; सोलापुरात फॉर्च्यूनर थेट 50 फूट खोल कॅनॉलमध्ये कोसळली अन्..

अर्धवट कामामुळे पुलाचा अंदाजच आला नाही; सोलापुरात फॉर्च्यूनर थेट 50 फूट खोल कॅनॉलमध्ये कोसळली अन्..

कुर्डुवाडीवरुन पंढरपूरकडे येणारी गाडी आष्टी रोपळे येथे अंदाज न आल्याने कॅनॉलमध्ये कोसळली. या घटनेत दोन महिला गंभीर जखमी झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur, India

सोलापूर 28 नोव्हेंबर : पंढरपूर -कुर्डुवाडी रोडवर फॉर्च्यूनर गाडीचा जबरदस्त अपघात झाला आहे. या अपघातात ही गाडी पुलावरुन ५० फूट खाली कॅनॉलमध्ये कोसळली. कुर्डुवाडीवरुन पंढरपूरकडे येणारी गाडी आष्टी रोपळे येथे अंदाज न आल्याने कॅनॉलमध्ये कोसळली. या घटनेत दोन महिला गंभीर जखमी झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

Chandrapur Railway Accident : LIVE VIDEO रेल्वे पादचारी ब्रिज कोसळला, 15 ते 20 प्रवाशांसोबत धक्कादायक घडलं

याठिकाणी एसआयआयएल कंपनीने रस्त्याचे काम केले असून पुलाच्या अर्धवट राहिलेल्या कामामुळे अपघात घडत आहेत.. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला अर्धवट राहिलेल्या कामामुळे अपघात घडू शकतात याचा साधा सुचना फलकही लावला नाही. अशात अनेकदा नागरिकांना पुलाचं काम अर्धवट राहिल्याचा अंदाज येत नाही.

संबंधित रस्ते विकासक कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. सुदैवाने चारचाकीच्या या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, पुलावरुन कार थेट 50 फूट खाली कोसळल्याने दोन महिला या घटनेत गंभीर जखमी झाल्या आहेत. कंपनीच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे.

नशिब बलवत्तर म्हणून वाचले प्राण... हा थरारक Video पाहून तुमचा देखील श्वास थांबेल

स्विमिंग पुलमध्ये बुडून मुलीचा मृत्यू -

दुसऱ्या एका घटनेत लोणावळ्यात अवघ्या दोन वर्षाच्या चिमुकलीचा स्वीमिंग पुलात बुडून मृत्यू झाला आहे. हानीयाझैरा सैयद असं मृत्यू झालेल्या चिमुकलीचं नाव आहे. या मुलीच्या वडिलांनी लोणावळा शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. चिमुकलीचे वडील आणि इतर कुटुंबातील सदस्य नाश्ता करत होते, तेव्हा ओरडण्याचा आवाज आला. हानीयाझैरा हिचा स्वीमिंग पुलात पडल्याने बुडून मृत्यू झाल्याचं समोर आलं. तिला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं पण तोपर्यंत उशीर झाला होता..

First published:

Tags: Accident, Solapur