चंद्रपूर, 27 नोव्हेंबर : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. बल्लारपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे फुट ओवर ब्रिजचा स्लॅब कोसळला आहे. प्रवासी चालत जात असताना अचानक एक स्लॅब कोसळून दहा प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बल्लारपूर येथे काजीपेठ ही पॅसेंजर रेल्वे स्थानकावर येणार असल्याने जाणाऱ्या या रेल्वेतून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त होती. या दरम्यान ही घटना घडली आहे.
मिळालेल्या महितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. बल्लारपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे फुट ओवर ब्रिजचा स्लॅब कोसळला आहे. प्रवासी चालत जात असताना अचानक एक स्लॅब कोसळून 15 ते 20 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
#WATCH | Slabs fall off of a foot over bridge at Balharshah railway junction in Maharashtra's Chandrapur; people feared injured pic.twitter.com/5VT8ry3ybe
— ANI (@ANI) November 27, 2022
Chandrapur Railway Accident : LIVE VIDEO रेल्वे पादचारी ब्रिज कोसळला, 15 ते 20 प्रवाशासोबत भयंकर घडलं#ChandraPur #RailwayAccident #RailwayBridge #MaharashtraNews #News18Lokmat pic.twitter.com/9yqLwch8PA
— News18Lokmat (@News18lokmat) November 27, 2022
हे ही वाचा : गर्दीच्या ठिकाणीच वडापाव विक्रेत्यांवर कोयत्यानं हल्ला, घटनेनं नाशिक हादरलं, Live Video
बल्लारपूर येथे काजीपेठ ही पॅसेंजर रेल्वे स्थानकावर येणार असल्याने जाणाऱ्या या रेल्वेतून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त होती. या दरम्यान ही घटना घडली आहे. दरम्यान प्रवाशी जात असताना औव्हरहेड वायरचा अतिउच्च दाबाचा स्पर्श झाल्याने काही प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.
यावेळी बल्लारपूर रेल्वे स्थानकाचे अधिकारी कर्मचारी सर्व जखमी प्रवाशांना मदत करत आहेत. दरम्यान अचानक घटना घडल्याने परिसरात मोठी गर्दी झाली होती. तसेच जखमी प्रवाशांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आल्याने रुग्णालय परिसरातही नातेवाईकांनी गर्दी केली होती. दरम्यान गर्दीमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून पोलीस घटनास्थळी पोहोचत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला.
भुयार खोदून केली रेल्वे इंजिनची चोरी
'रेल्वेची संपत्ती तुमचीच संपत्ती आहे. कृपया तिची काळजी घ्या', अशा कितीतरी सूचना बोगीच्या आतमध्ये ठिकठिकाणी लिहिलेल्या असतात. या सूचना बिहारमधील काही चोरट्यांनी जास्तच गांभीर्यानं घेतल्याचं दिसत आहे. या चोरट्यांनी रेल्वे आपली स्वत:चीच संपत्ती असल्याप्रमाणे रेल्वेच्या इंजिनासह अनेक पार्ट्स चोरण्याचा धडाका सुरू केला आहे.
हे ही वाचा : धुळे-औरंगाबाद महामार्गावर बाईक अन् ट्रॅक्टरने घेतला पेट, सर्व जळून खाक, तिघे गंभीर
एका घटनेमध्ये तर रेल्वे इंजिनच्या चोरीसाठी चोरट्यांनी बरौनी ते मुझफ्फरपूरपर्यंत एक भुयार खोदल्याचं उघड झालं आहे. ‘नवभारत टाइम्स’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chandrapur, Railway accident, Railway track, चंद्रपूर chandrapur