मराठी बातम्या /बातम्या /Viral /

नशिब बलवत्तर म्हणून वाचले प्राण... हा थरारक Video पाहून तुमचा देखील श्वास थांबेल

नशिब बलवत्तर म्हणून वाचले प्राण... हा थरारक Video पाहून तुमचा देखील श्वास थांबेल

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता हा तरुण एका सेकंदाच्या अंतराने एका भीषण अपघातातून थोडक्यात बचावला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई २७ नोव्हेंबर : माणसाची वेळ चांगली असेल तर कोणतंही संकट त्याचं काहीही बिघडवू शकत नाही. तुम्ही लोकांना असं बोलताना अनेकदा ऐकलं असेल. पण सध्या सोशल मीडियावर या संबंधीत एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हाला ही म्हण खरी असल्याचं जाणवेल.

या व्हिडीओमध्ये एक तरुण कसा वाचला आहे, हे तुम्ही पाहू शकता. हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हाला हेच म्हणावेसे वाटेल की कदाचित आज यमराज सुट्टी वर असावा.

हे ही पाहा : मृत्यूचा थरार! भरधाव कारने तरुणीला फुटबॉल सारखं उडवलं, Video सोशल मीडियावर व्हायरल

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता हा तरुण एका सेकंदाच्या अंतराने एका भीषण अपघातातून थोडक्यात बचावला आहे. जर त्या माणसाचं नशीब चांगलं नसतं, तर कदाचित तो जिवंत नसता.

व्हिडीओत सुरुवातीला एक व्यक्ती पाठीवर पिशवी लटकवून उभा असल्याचे दिसत आहे. तो रस्त्याच्या कडेला असलेल्या रेलिंगच्या बाजूला उभा आहे. व्हिडीओमध्ये असं दिसतंय की, त्या व्यक्तीच्या बुटाला काहीतरी लागलं आहे, जे तो काढण्याचा प्रयत्न करत आहे.

या काळात पुढच्याच क्षणी तिथे काय घडणार आहे, हे त्याच्या लक्षातच आलं नाही आणि तो तिथेच मागे पुढे करत राहिला. तेवढ्यात थराराक घटना घडली.

एक अनियंत्रीत कार भरधाव वेगाने आली आणि हा तरुण उभ्या असलेल्या मेटलच्या पोलला धडकली. काहीच क्षणांपूर्वी हा तरुण तेथून थोडा बाजूला झाला. जेव्हा हा सगळा प्रकार घडला होता.

हे दृश्य पाहून तुमचं हृदय हेलावून जाईल. हा व्हिडीओ @TheFigen_ नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे.

हा व्हिडीओ सर्वांसाठी एक उदाहरण म्हणून देखील समोर आला आहे. आपण सर्वांनी रस्त्याने चालताना तसेच गाडी चालवताना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच रस्त्याने चालताना आजूबाजूला लक्ष ठेवणं देखील तेवढंच गरजेचं आहे. कारण कधीकधी आपण बरोबर असलो तरी देखील समोरच्या व्यक्तीच्या चुकांमुळे मोठ-मोठे अपघात घडतात.

जर तुम्ही सावधगीरी बाळगली, तर तुम्ही अशा अपघातांपासून स्वत:ला तसेच इतरांना वाचवू शकता.

First published:

Tags: Road accident, Shocking video viral, Social media, Top trending, Videos viral, Viral