मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /...तर फडणवीसांची हत्तीवरून मिरवणूक काढणार; पंढरपूरमधील नागरिकांचा मोठा निर्णय

...तर फडणवीसांची हत्तीवरून मिरवणूक काढणार; पंढरपूरमधील नागरिकांचा मोठा निर्णय

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

सध्या पंढरपूर कॉरिडोरचा मुद्दा चांगलाच तापला आहे. पंढरपूर कॉरिडोरला स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांचा विरोध आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pandharpur, India

पंढरपूर, 13 डिसेंबर :  सध्या पंढरपूर कॉरिडोरचा मुद्दा चांगलाच तापला आहे. पंढरपूर कॉरिडोरला स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांचा विरोध आहे. याच मुद्यावरून आम्ही कर्नाटकमध्ये जातो असा इशारा देखील पंढरपूरच्या नागरिकांनी दिला होता. त्यानंतर पंढरपूर उद्ध्वस्त  न करता पंढरपूरचा विकास करू असं अश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना दिले. त्यानंतर आता हालचालींना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या अश्वासनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पंढरपूरमधील स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वारकऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या आभाराचा ठाराव मंजूर करण्यात आला.

..तर हत्तीवरून मिरवणूक काढणार 

पंढरपूरमधील कुठल्याही नागरिकाच्या घराला धक्का न लावता, कोणाचेही विस्थापन न करता पंढरपूरचा विकास करू, असं अश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरमध्ये बोलताना दिलं आहे. त्यामुळे जर त्यांनी आपलं अश्वासन पाळलं, कोणाच्याही घराला धक्का न लावता त्यांनी पंढरपूरचा विकास केला, तर त्यांची आम्ही  पंढरपुरातून हत्तीवरून मिरवणूक काढू अशी घोषणा या बैठकीमध्ये मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केली आहे.

हेही वाचा :  पंढरपुरात 'हिवसाळा'; ऐन डिसेंबरमध्ये धुवाँधार पाऊस

विविध विषयांवर चर्चा   

पंढरपूर कॉरिडोरच्या पार्श्वभूमीवर सोमवारी  पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती, संतभूमी बचाव समिती तसेच सर्वपक्षीय बैठक  पंढरपूरमध्ये पार पडली. या बैठकीत याबाबतचा ठराव झाला. या बैठकीत पंढरपूर कॉरिडोरबाबत विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच कॉरिडॉर झाल्यास यामध्ये स्थानिकांचं नुकसान होऊ नये, यासाठी काय करता येईल? पुढील भूमिका काय असेल यावर देखील चर्चा झाली. पंढरपूर कॉरिडोरला स्थानिकांचा मोठ्याप्रमाणात विरोध आहे. आता या पार्श्वभूमीवर सरकार काय भूमिका घेणार हे पहाणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

First published:
top videos

    Tags: BJP, Devendra Fadnavis, Pandharpur, Pandharpur news