पंढरपूर, 12 डिसेंबर : गेल्या दोन दिवसांपासुन राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. थंडीचा जोर वाढण्याऐवजी ऐन डिसेंबर महिन्यात मुसळधार पाऊस पडत आहे. पंढरपूर शहरासह परिसरात मोठा पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
पंढरपूरात 'हिवसाळा'; ऐन डिसेंबरमध्ये धुवांधार पाऊस#Pandharpur #HeavyRains #MaharashtraNews #News18Lokmat pic.twitter.com/7dqyXVlkY0
— News18Lokmat (@News18lokmat) December 12, 2022
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात अनेक भागात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात हलक्या सरीही पडल्या. तर पुण्यातही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने येत्या दोन दिवसात राज्यातील विविध भागात पावसाची शक्यता असल्याची माहिती दिली. हेही वाचा : Weather Update: पुणे, मुंबईसह राज्यातील या जिल्ह्यांत आजही मुसळधार पाऊस; वातावरणात गारवा वाढला राज्यात रविवारी दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्रात सांगली, कोल्हापूर, पुण्यात पाऊस पडला. तर येत्या दोन दिवसात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.