6 वर्षाय चिमुरड्यानं बघितले अनैतिक संबंध, बदनामी होईल म्हणून तरुणानं काढला त्याचा काटा!

6 वर्षाय चिमुरड्यानं बघितले अनैतिक संबंध, बदनामी होईल म्हणून तरुणानं काढला त्याचा काटा!

पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह पुलावरून फेकून दिला...

  • Share this:

भंडारा, 25 नोव्हेंबर: अनैतिक संबंध बघितल्यानं एका 6 वर्षीय चिमुरड्याचं (Six Year old boy) अपहरण करून त्याची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मोहाडी (Mohadi, Bhandara) तालुक्यातील सालेबर्डी येथील हा मुलगा असून भंडारा तालुक्यातील चोवा नाल्याजवळ त्याचा मृतदेह सापडला आहे. विहान असं मृत मुलाचं नाव असून या प्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.  निलेश चंदन गजभिये (वय-23, रा. सालेबर्डी, ता. मोहाडी) असं आरोपी तरुणाचं नाव आहे.

हेही वाचा..'लव्ह जिहाद' कायद्यावरून भाजपला घरचा आहेर, शिवेंद्रसिंहराजेंना केला कडाडून विरोध

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, विहान हा 22 नोव्हेंबर रोजी गावातून अचानक बेपत्ता झाला होता. नातेवाईकांनी त्याचा सगळीकडे शोध घेतला पण तो सापडला नाही. नंतर मोहाडी तातुक्याती आंधळगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली होता. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन अप्पर पोलीस निरीक्षक अनिकेत भारती यांनी घटनास्थळी भेट दिली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण, आंधळगावचे ठाणे अमंलदार सुभास बारसे यांनी अक्षरश: संपूर्ण परिसर पिंजून काढला. परंतु कुठेही विहानचा थांगपत्ता लागत नव्हता. दरम्यान, मंगळवारी गावातील निलेश गजभिये या तरुणाला संशयावरून ताब्यात घेण्यात आलं. त्याची चौकशी केली असता त्यानं उडवाउडवीची उत्तर दिली. यावरून त्याच्यावरील संशय आणखीच बळावला. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं विहानचं अपहरण करून त्याची निर्घृण हत्या केल्याची कबुली दिली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यानं मृतदेह भंडारा तालुक्यातील पहेला जंगलातील चोवा नाल्यावरील पुलावरून फेकल्याची पोलिसांना माहिती दिली.

अनैतिक संबंध बघितले, गावात बदनामी होईल म्हणून...

विहान यानं निलेशचे असलेले अनैतिक संबंध बघितले होतं. त्यामुळे तो आता गावात आपली बदनामी करेन, यामुळे निलेश यांनं त्याला ठार मारण्याचा कट रचला. रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास निलेश यानं मोबाईल दाखवण्याच्या बहाण्यानं बोलवलं. विहानला आपल्या दुचाकीवर बसवलं आणि थेट भंडारा येथे नेलं. तिथून निलेश त्याला पहेलाच्या जंगलात घेऊन गेला. चोवा नाल्याच्या पुलावर निलेशनं विहानचा गळा आवळला. विहानचा मृत्यू झाल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा पुलावरून खाली फेकून दिलं.

हेही वाचा...'उद्धव ठाकरे हे प्रशासनासाठी जन्मले नाहीत तर ते पक्ष चालवण्यासाठीच जन्मले आहेत'

पोलिसांनी आरोपी निलेश गजभिये याला घटनास्थळी नेऊन विहानचा मृतदेह शोधून काढला. पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी विहान मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: November 25, 2020, 5:40 PM IST

ताज्या बातम्या