'उद्धव ठाकरे हे प्रशासनासाठी जन्मले नाहीत तर ते पक्ष चालवण्यासाठीच जन्मले आहेत'

'उद्धव ठाकरे हे प्रशासनासाठी जन्मले नाहीत तर ते पक्ष चालवण्यासाठीच जन्मले आहेत'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रशासनाचा काय संबंध?

  • Share this:

कोल्हापूर, 25 नोव्हेंबर: राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारला (Maha Vikas Aaghdi Government) एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विखारी टीका केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रशासनाचा काय संबंध? असा थेट सवाल करत उद्धव ठाकरे हे प्रशासनासाठी जन्मले नाहीत तर ते पक्ष चालवण्यासाठीच जन्मले आहेत, असं टीकास्त्र देखील चंद्रकांत पाटील यांनी सोडलं आहे. प्रशासन चालवणं ही सोपी गोष्ट नाही. उद्धव ठाकरेंना प्रशासनाशी संबंधित शंभर प्रश्न विचारले तर त्यांना उत्तरं देता येणार नाही, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी शरसंधान साधलं आहे.

हेही वाचा...सरकारमधील तिघांच्या वादामुळे मराठा आरक्षणाचं मातेरं झालं, चंद्रकांतदादा भडकले

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं. उद्धव ठाकरे यांना प्रशासन चालवता येत नाही. ते केवळ पक्ष चालवू शकतात. कारण ते कधी साधे नगरसेवक झाले नाही, आमदार आणि खासदार तर दुरची गोष्ट. राज्याचं प्रशासन चालवताना कोर्टात हजार प्रश्न घेऊन बसावं लागतं, संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्न हाताळण्याचे आदेश द्यावे लागतात. प्रशासनावर वचक असणं ही वेगळी बाब आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनीही पक्षावरच कायम कंट्रोल ठेवला. त्यांनीही कधी निवडणूक लढवली नाही. बाळासाहेबांनी जो नियम पाळला. तो उद्धव ठाकरेंनी पाळला नाही. एकदम अंगावर जबाबदारी पडल्यावर असं होतं. त्यामुळेच राज्यातील प्रश्न सोडवण्यात त्यांना सपशेल अपयश आलं आहे, असाही टोला चंद्रकांतदादांनी यावेळी लगावला.

समोरासमोर बसू... त्यांनी केवळ 'क्रॉस सबसिडी'चा अर्थ सांगावा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. आम्ही समोरासमोर बसू त्यांनी केवळ 'क्रॉस सबसिडी' म्हणजे काय याचा अर्थ सांगावा. एवढं नाही तर त्यांनी पुस्तकं पाहून उत्तरं द्यावीत, असं आव्हान चंद्रकांतदादांनी उद्धव ठाकरेंनी दिलं. पण कोणत्या पुस्तकात उत्तर आहे, हे देखील उद्धव ठाकरेंना सांगता येणार नाही, असा टोलाही यावेळी चंद्रकांतदादांनी लगावला.

हेही वाचा...मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची लवकरच विशेष मुलाखत, काय बोलणार याकडे लक्ष

संजय राऊतांचाही घेतला समाचार...

चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांचाही यावेळी समाचार घेतला. संजय राऊतांकडे भाजपच्या 100 नेत्यांची नावे असतील तर त्यांनी त्वरीत ईडीला पाठवावी, असं आव्हान दिलं.

आमचीही राज्यात सत्ता आहे. आम्हालाही चौकशा लावता येतात, असा इशारा संजय राऊत यांनी दिला होता. त्याला चंद्रकांतदादांनी पलटलार केला. चंद्रकांतदादा म्हणाले, संजय राऊतांचं तोंड कुणी बांधले. कुणी तुमचे हात बांधले आहे. त्यांनी खुशाल भाजप नेत्यांच्या चौकशा लावाव्या.

Published by: Sandip Parolekar
First published: November 25, 2020, 4:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading