मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'त्या चर्चेला अर्थ नाही', निलेश राणेंनी भाऊ नितेश यांचाच दावा काढला खोडून!

'त्या चर्चेला अर्थ नाही', निलेश राणेंनी भाऊ नितेश यांचाच दावा काढला खोडून!

'एका दिवसात युती होईल, असे काही आदेश नाही. त्यामुळे नितेश यांना युती करायची, आम्हाला कोकणात युती करायची आहे, असं काहीही नाही'

'एका दिवसात युती होईल, असे काही आदेश नाही. त्यामुळे नितेश यांना युती करायची, आम्हाला कोकणात युती करायची आहे, असं काहीही नाही'

'एका दिवसात युती होईल, असे काही आदेश नाही. त्यामुळे नितेश यांना युती करायची, आम्हाला कोकणात युती करायची आहे, असं काहीही नाही'

रत्नागिरी, 13 जुलै : भाजपचे आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी शिवसेनेसोबत (shivsena) जुळवून घेण्याची भाषा केली होती. त्यावरून अनेक चर्चांना उधाण आले होते. पण, नितेश यांनी कुठल्या तरी आधारावर असं वक्तव्य केलं असेल, पण वरिष्ठांकडून आम्हाला असा कोणताही आदेश नाही, त्या चर्चेला काही अर्थ नाही' असा खुलासा भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे (nilesh rane) यांनी केला आहे.

पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर शिवसेना आणि भाजप युतीची चर्चा रंगली होती. नितेश राणे यांनी सुद्धा युतीचे संकेत दिले होते. न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना निलेश राणे यांनी मात्र, त्यांच्या विधानावर खुलासा केला आहे.

कोण म्हणतं हे मिर्झा गालिबांनी लिहिलंय? अमिताभ बच्चन फेक शायरीमुळे ट्रोल

'शिवसेना आणि भाजपच्या युतीचा कोणताही निर्णय नाही किंवा शिवसेनेशी जुळवून घ्या असं देखील आम्हाला पक्ष नेतृत्वानं सांगितलं नाही' अशी प्रतिक्रिया निलेश राणे यांनी दिली.

तसंच, 'नितेश राणे यांनी याबाबतच आपलं मत व्यक्त केलं आहे. ते कुठला तरी संदर्भ घेऊन बोलले असतील. पण आजच्या आज युती करा असा काही आदेश नाही. कोणत्याही संदर्भावर युती होऊ शकत नाही. त्यांनी एका कार्यक्रमात कुठला तरी संदर्भ देऊन युतीचे विधान केले होते. एका दिवसात युती होईल, असे काही आदेश नाही. त्यामुळे नितेश यांना युती करायची, आम्हाला कोकणात युती करायची आहे, असं काहीही नाही, एक राजकीय कार्यक्रम होता, तिथं व्यासपीठावर असलेल्या लोकांच्या समोर त्यांनी विधान केले आहे, पण त्याच्यापलीकडे युतीच्या चर्चेला काही अर्थ नाही, असं काही होईल मला वाटत नाही, असंही निलेश राणे म्हणाले.

झोटिंग समिती फार्स, खडसेंना बदनाम करण्याचा डाव होता का? नाना पटोले

'सध्या शिवसेनेची प्रतिमा मलिन झाली आहे. भ्रष्टाचाराने त्यांची हात बरबटलेली आहे. उलट आम्हाला नाही तर शिवसेनेला आता गरज आहे, असं देखील ते म्हणाले. दरम्यान, आमदार नितेश राणे यांच्या विधानानंतर पहिल्यांदाच राणे कुटुंबातून यावर प्रतिक्रिया आली आहे.

First published:

Tags: BJP, Shivsena