मुंबई 13 जुलै: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. अनेक पोस्ट ते शेअर करत असतात. कधी आपलं कामकाज तर कधी दिनचर्याही सोशल मीडियावर ते शेअर करताना दिसतात. कधी चांगले विचार, शायरीही पोस्ट करतात. पण यावेळी त्यांनी शेअर केलेली शायरी त्यांना महागात पडलेली दिसत आहे. फेक शायरीमुळे बिग बींना ट्रोल व्हाव लागत आहे.
अमिबाभ यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर मिर्झा गालिब (Mirza Galib) यांची शायरी पोस्ट केली होती. तर या दोन शायरी एक गालिबांची तर दुसरी इक्बाल यांची असं त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं. पण वास्तविकता या दोन्ही शायरी ना गालिबांच्या आहेत ना इक्बाल यांच्या असं युझर्सचं म्हणणं आहे. त्यामुळे कोणतीही शहानिशा न करता त्यांनी पोस्ट केल्याने युझर्सनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली.
यानंतर अनेकांनी या पोस्टवर आपआपली मतं व्यक्त केली आहेत. काहींनी बिग बींना टीचर बदलण्याचा सल्ला दिला तर काहींनी क्रॉस चेक करून पोस्ट करण्यास सांगीतलं. तर एका युझरने लिहिलं की, ‘आपली टीम बदला प्रभू, बिना कोणत्या माहितीचं काहीही पोस्ट करू नका.’ तर आणखी एकाने लिहिलं, ‘आज गालिब असते तर त्यांनी आत्महत्या केली असती, असही तुम्ही आता लोकसभेत असायला पाहिजे. अशा शायरी गालिबांच्या नावावर तिथेच शोभतात.’
'अग्निपथ'मधील हृतिक रोशनची बहीण आठतेय का? आता दिसतेय फारच ग्लॅमरस आणि बोल्ड
अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोपती’च्या 13 व्या (Kaun Banega Crorepati) सिझनचं चित्रिकरण करत आहेत. त्यांचे काही चित्रपट हे प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. तर काहींचं चित्रिकरण सुरू आहे. त्यांच्या आगामी चित्रपटांच्या यादीत झुंड, चेहरे, ब्रह्मास्त्र, मेडे यासंहीत अन्य काही चित्रपटही आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amitabh Bachchan, Entertainment