मुंबई, 13 जुलै: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath khadse) यांना क्लीन चिट देणाऱ्या झोटिंग समितीचा अहवाल गायब झाल्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मुळात झोटिंग समिती (zoting committee) हा फार्स होता का? देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलणारे मुख्यमंत्री होते. बहुजन नेत्याला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्राचा वापर केला का? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी उपस्थितीत केला.
'भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांनी ईडीने समन्स बजावला आहे. त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे. पण, ज्या झोटिंग समितीने क्लीन चिट दिला होता, त्याचा अहवालच गायब झाल्याचं समोर आलं आहे. याच मुद्यावर नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
कर्जाच्या ओझ्यामुळे केली आत्महत्या, ‘या’ काळजीपोटी भावाचाही घेतला जीव
'एकनाथ खडसे हे बहुजन समाजातील नेते आहे. बहुजन नेत्यांचा चेहरा वापरायचा आणि नंतर फेकून द्यायचा हे नेहमी भाजपमध्ये घडलंय. खडसे यांना बदनाम करण्याचे काम करायचे होते म्हणून षडयंत्र वापर केले का असा प्रश्न पडतोय. देवेंद्र फडणवीस हे खोटे मुख्यमंत्री होते. झोटिंग समितीचा अहवाल हा केवळ फास होता का?' असं म्हणत नाना पटोले यांनी टीकास्त्र सोडलं.
दोन दिवस एच.के.पाटील यांनी मुंबईत आमच्याशी संवाद साधून आढावा घेत आहे. महागाई संदर्भात चर्चा झाली. केंद्र सरकार विरोधात आंदोलन वाढवणे, येणाऱ्या निवडणुकांबाबत चर्चा झाली. तसंच काँग्रेस पक्षात अंतर्गत वादावर चर्चा झाली. पण आमच्यात कोणताही वाद नाही, चुकीच्या बातम्या दाखवल्या जात आहे, असंही पटोले म्हणाले.
'एकनाथ खडसे आणि गोपीनाथ मुंडे यांनी भाजपला वाढवलं. पण भाजपने गोपीनाथ मुंडे यांच्यावर अन्याय केला होता. हे सर्वांना माहिती आहे. त्यांना योग्य ती जबाबदारी देण्यात आली नाही. अनेक वेळा डावलण्यात आलं. आता त्यांच्या मुलीवर भाजप अन्याय करत आहे. पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय होत आहे', अशी टीकाही पटोलेंनी केली.
'केंद्रीय व्यवस्था प्रसारमाध्यमांवर दबाव आणत आहे. केंद्रातील सरकार सगळ्यांवर दबाव ठेवत आहे. येथ ही आयबी इतर व्यवस्था लोक असतील, पण माझ्या वक्तव्य मात्र वेगळ्या स्वरुपात दाखवले. पक्ष आणि सरकार वेगळे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका पक्षप्रमुख आणि सरकार म्हणून वक्तव्य वेगळे असतात. काँग्रेस प्रदेश म्हणून मी काम करतो, सरकार आणि पक्ष फरक असतो. पवार आणि ठाकरे यांचे वक्तव्य वेगळा अर्थ काढला जात नाही पण माझ्या वक्तव्य वेगळा अर्थ का काढला जातो माहिती नाही', असंही पटोले म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath khadse, Maharashtra, Mumbai