पालघर 23 नोव्हेंबर : संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. आता नुकतंच श्रद्धाने पोलिसांत केलेल्या तक्रारीचं एक पत्र समोर आलं होतं. ज्यात आफताबकडून आपल्या जीवाला धोका असल्याची भीती श्रद्धाने 2020 मध्येच व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. मात्र, श्रद्धाने तक्रार करूनही पोलिसांनी काहीच कारवाई का केली नाही? असा सवाल यानंतर उपस्थित झाला आहे. यावर आता तुळींज पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे. श्रद्धा वालकरचं पोलीस ठाण्यातील एक पत्र व्हायरल होत आहे. त्या पत्रात आफताब आपल्याला ठार मारून तुकडे तुकडे करण्याची भीती तिने व्यक्त केली होती. याप्रकरणी पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी सांगितलं, की या पत्रानंतर श्रद्धाने तिची तक्रार मागे घेतली होती. यामुळे या प्रकरणात पुढे काही कारवाई झाली नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. shraddha walker case : एक होती श्रद्धा वालकर, कॉलेजमधला जुना VIDEO आला समोर या प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, की 2020 ला श्रद्धा वालकर हिने जिवाला धोका असल्याचं पत्र महाराष्ट्राच्या पोलिसांना लिहीलं होतं. ते पत्र माझ्याकडे पण आलं आहे. अत्यंत गंभीर पत्र होतं. पण त्याच्यावर कारवाई का झाली नाही याची माहिती नाही. त्याबद्दल कोणावरही दोषारोपण करू इच्छित नाही.. मात्र, याची चौकशी व्हायला हवी. अशा प्रकारच्या पत्रावर कारवाई का होत नाही. त्या पत्रावर कारवाई झाली असती तिचा जीव वाचला असता, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. श्रद्धाने तक्रारीत काय म्हटलं होतं? नुकतंच श्रद्धाचं एक पत्र समोर आलं आहे.दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पत्र श्रद्धाने लिहिलं होतं आणि तिच्या मृत्यूपूर्वी तिने आफताबने तिची हत्या करणार असल्याची शक्यता व्यक्त केली होती. तिने हे पत्र/तक्रार महाराष्ट्र पोलिसांना दिली होती. हे पत्र 28 नोव्हेंबर 2020 रोजीचं आहे. तक्रार पत्रात श्रद्धाने आफताबकडून केलं जाणारं ब्लॅकमेलिंग आणि प्राणघातक हल्ला यासह अनेक गंभीर आरोप केले होते. आफताब हत्या करून तुकडे करणार हे श्रद्धाला आधीच माहिती होतं? 2 वर्षांपूर्वीचं ते पत्र समोर या पत्रात लिहिलं आहे, की आफताब मला मारहाण करतो. त्याने मला आज धमकी दिली की तो माझी हत्या करून तुकडे करून फेकून देईल. मागील सहा महिन्यांपासून तो मला मारहाण करून माझा छळ करत आहे. मात्र, पोलिसांत जाण्याची माझी हिंमत नाही, कारण तो मला मारण्याची धमकी देतो. तो मला मारहाण करतो आणि जीवे मारण्याची धमकी देतो, याबद्दल त्याच्या पालकांनाही माहिती आहे, असंही या पत्रात म्हटलं गेलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.