नवी दिल्ली 23 नोव्हेंबर : श्रद्धा वालकर हत्याकांड दररोज नवनवे खुलासे होत आहेत. श्रद्धाचा लिव्ह इन पार्टनर आफताब पूनावाला याने श्रद्धाचा गळा दाबून खून केला आणि यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे करून दिल्लीतील विविध भागात फेकले. आता या प्रकरणात आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. श्रद्धा वालकर हिचं एक जुनं पत्र समोर आलं आहे. ज्यात तिने आफताब आपली हत्या करणार असल्याची शक्यता वर्तवली होती. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पत्र श्रद्धाने लिहिलं होतं आणि तिच्या मृत्यूपूर्वी तिने आफताबने तिची हत्या करणार असल्याची शक्यता व्यक्त केली होती. तिने हे पत्र/तक्रार महाराष्ट्र पोलिसांना दिली होती. हे पत्र 28 नोव्हेंबर 2020 रोजीचं आहे. तक्रार पत्रात श्रद्धाने आफताबकडून केलं जाणारं ब्लॅकमेलिंग आणि प्राणघातक हल्ला यासह अनेक गंभीर आरोप केले होते. श्रद्धाची हत्या का केली?, आफताफने कोर्टात सांगितली ‘ती’ परिस्थिती… या पत्रात लिहिलं आहे, की आफताब मला मारहाण करतो. त्याने मला आज धमकी दिली की तो माझी हत्या करून तुकडे करून फेकून देईल. मागील सहा महिन्यांपासून तो मला मारहाण करून माझा छळ करत आहे. मात्र, पोलिसांत जाण्याची माझी हिंमत नाही, कारण तो मला मारण्याची धमकी देतो. तो मला मारहाण करतो आणि जीवे मारण्याची धमकी देतो, याबद्दल त्याच्या पालकांनाही माहिती आहे, असंही या पत्रात म्हटलं गेलं आहे. [gallery ids=“790058”] पुढे या पत्रात लिहिलं आहे, की आफताबच्या पालकांना हेदेखील माहिती आहे, की आम्ही एकत्र राहातो. ते अनेकदा इथे येतात. मी आजपर्यंत त्याच्यासोबत राहिले कारण आम्ही लग्न करणार होतो आणि त्याच्या कुटुंबीयांचाही यासाठी पाठिंबा होता. यापुढे मला त्याच्यासोबत राहायचं नाही. मात्र, तो मला सतत मारण्याची धमकी देत आहे, असं या पत्रात म्हटलं आहे. काय आहे प्रकरण - दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनावाला याने 18 मे रोजी संध्याकाळी श्रद्धा वालकर (27) हिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले, जे त्याने दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथील त्याच्या निवासस्थानी सुमारे तीन आठवडे 300 लिटरच्या फ्रीजमध्ये ठेवले. श्रद्धाचे शरीराच्या तुकड्यांची तो अनेक दिवस दिल्लीच्या विविध भागात विल्हेवाट लावत होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.