वसई, 23 नोव्हेंबर : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे अवघा देश सुन्न झाला. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहे. अशातच आता श्रद्धाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ तिचा कॉलेजमध्ये असतानाचा आहे. श्रद्धा वालकर प्रकरणी सध्या पोलीस तपास करत आहे. विकृत प्रियकर आफताबची सखोल चौकशी सुरू आहे. अशातच श्रद्धाचा कॉलेज जीवनातला एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कॉलेजमध्ये असताना एका कार्यक्रमातला हा व्हिडीओ आहे.
श्रद्धा वालकर हिचा जुना व्हिडीओ आला समोर pic.twitter.com/3CXkibK8g4
— News18Lokmat (@News18lokmat) November 23, 2022
कॉलेजमधील एका क्लास रुमध्ये काही विद्यार्थी हे नाट्य सादर करत आहे. यावेळी समोरच श्रद्धा आपल्या मैत्रिणींसोबत वावरत आहे.दरम्यान, श्रद्धा वालकर हिचं एक जुनं पत्र समोर आलं आहे. ज्यात तिने आफताब आपली हत्या करणार असल्याची शक्यता वर्तवली होती. (विवाहितेसोबतचे अनैतिक संबंध जीवावर बेतले; नांदेडमधील तरुणाचा भयानक शेवट) दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पत्र श्रद्धाने लिहिलं होतं आणि तिच्या मृत्यूपूर्वी तिने आफताबने तिची हत्या करणार असल्याची शक्यता व्यक्त केली होती. तिने हे पत्र/तक्रार महाराष्ट्र पोलिसांना दिली होती. हे पत्र 28 नोव्हेंबर 2020 रोजीचं आहे. तक्रार पत्रात श्रद्धाने आफताबकडून केलं जाणारं ब्लॅकमेलिंग आणि प्राणघातक हल्ला यासह अनेक गंभीर आरोप केले होते. या पत्रात लिहिलं आहे की, ‘आफताब मला मारहाण करतो. त्याने मला आज धमकी दिली की तो माझी हत्या करून तुकडे करून फेकून देईल. मागील सहा महिन्यांपासून तो मला मारहाण करून माझा छळ करत आहे. मात्र, पोलिसांत जाण्याची माझी हिंमत नाही, कारण तो मला मारण्याची धमकी देतो. तो मला मारहाण करतो आणि जीवे मारण्याची धमकी देतो, याबद्दल त्याच्या पालकांनाही माहिती आहे’, असंही या पत्रात म्हटलं गेलं आहे. (श्रद्धाची हत्या गळा दाबून नाही तर.. दिल्ली पोलिसांची नवीन थिअरी, घटनेची मोठी अपडेट) पुढे या पत्रात लिहिलं आहे की, ‘आफताबच्या पालकांना हेदेखील माहिती आहे की, ‘आम्ही एकत्र राहातो. ते अनेकदा इथे येतात. मी आजपर्यंत त्याच्यासोबत राहिले कारण आम्ही लग्न करणार होतो आणि त्याच्या कुटुंबीयांचाही यासाठी पाठिंबा होता. यापुढे मला त्याच्यासोबत राहायचं नाही. मात्र, तो मला सतत मारण्याची धमकी देत आहे’, असं या पत्रात म्हटलं आहे.