मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'काय दारु...काय चकणा..समदं कसं ओके'; युवासेनेचा शहाजीबापूंना टोला, दिली मातोश्रीवर नोकरीची ऑफर

'काय दारु...काय चकणा..समदं कसं ओके'; युवासेनेचा शहाजीबापूंना टोला, दिली मातोश्रीवर नोकरीची ऑफर

युवासेनेच्या पोस्टमध्ये पाटील (Shahajibapu Patil) यांना टोमणा देत म्हटलं 'बापू मतदार संघात लक्ष द्या, महाराष्ट्र करमणूक दौरा बंद करा. काय दारु...काय चकणा.. काय ते ५० खोके समदं कसं ओके.'

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur, India

सोलापूर 01 सप्टेंबर : आमदार शहाजीबापू पाटील यांना अकलूजच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियातून प्रत्युत्तर दिलं आहे. मागील काही दिवसांपासून आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर अनेकदा टिका केली आहे. त्यामुळे आता शिवसेना पदाधिकारी आणि आमदार शहाजीबापू पाटील यांच्यामध्ये चांगलाच वाद पेटण्याची शक्यता आहे.

Sudhir Mungantiwar : दिवाळीपूर्वी पुढचा मंत्रिमंडळ विस्तार; सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं 'यांना' लागणार लॉटरी

काय झाडी, काय डोंगर..काय हाटेल....या डायलॉगमुळे प्रसिध्दीच्या झोतात आलेले शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील आता राज्यभर प्रसिद्ध झाले आहेत. सभेत बोलताना शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. पाटील यांच्या टिकेमुळे दुखावलेले पंढरपुरातील शिवसेनेचे पदाधिकारी त्यांच्या या टिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी चांगलेच आक्रमक होत पुढे सरसावले आहेत.

युवासेनेचे पंढरपूर विभागाचे जिल्हा प्रमुख गणेश इंगोल यांनी सोशल मीडियातून आमदार पाटील यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. शहाजीबापू पाटील यांनी नुकतंच बोलताना म्हटलं होतं, की उद्धवसाहेब आणि आदित्य साहेबांना सांगोल्यात दोन बंगळे भाड्याने घेऊन देतो. माझ्यावर जितकं लक्ष ठेवायचं तितकं ठेवा आणि मला पाडायचं असेल तर पाडा, असं चॅलेंज त्यांनी ठाकरेंना दिलं होतं. यावरुनच युवासेनेनं निशाणा साधत प्रत्युत्तर दिलं.

नारायण राणेंनी केली आदित्य ठाकरेंची उंदराशी तुलना, गणेशोत्सवात होणार 'शिमगा'?

युवासेनेच्या पोस्टमध्ये पाटील यांना टोमणा देत म्हटलं 'बापू मतदार संघात लक्ष द्या, महाराष्ट्र करमणूक दौरा बंद करा. काय दारु...काय चकणा.. काय ते ५० खोके समदं कसं ओके. बापू तुमच्यासाठी मातोश्रीवर नोकरी भेटेल. आम्ही शिवसैनिक तुमची शिफारस करु, टक्केवारी घेऊन आधी स्वतःचं घर पूर्ण करा. स्वतःच्या बायकोला ५० खोक्यातून साडी घेऊन द्या', अशी बोचरी टिका करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेअर केल्या आहेत.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी बंड केलं, या बंडात सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचाही सहभाग होता. या बंडानंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आमदार शहाजीबापू पाटील यांनी काही दिवसांपूर्वी माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला आता पंढरपूर येथील युवासेनेनं प्रत्युत्तर दिलं आहे.

First published:

Tags: Shivsena, Uddhav Thackeray