मुंबई, 1 सप्टेंबर : राज्याचे वनमंत्री विदर्भातील भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी गणपतीच्या आगमनाला राज्यातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत खुलासा केला आहे. (Sudhir Mungantiwar) यामध्ये दुसऱ्या टप्प्यात सात कॅबिनेट तर 17 राज्यमंत्र्यांचा विस्तार होणार असल्याचे ते म्हणाले, हा मंत्रींमंडळ विस्तार पुढच्या दोन महिन्यात म्हणजे दिवाळीपूर्वी मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. यामध्ये शिंदे गटातील काही नेत्यांना कॅबीनेट मंत्रीपदाची लॉटरी लागण्याची शक्यताही असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले कि, एकोणिस मंत्र्यांच्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी एकाही जिल्ह्याला पालकमंत्री नाही. त्यामुळे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार ऑक्टोबरमध्ये (दिवाळीपूर्वी) होईल. २८८ आमदारांच्या १५ टक्केच मंत्री होऊ शकतात. त्यामुळे मंत्र्यांची संख्या ४३ एवढीच असेल, असे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार स्पष्ट केले. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये २६ कॅबिनेट आणि १७ राज्यमंत्री असतील. दुसऱ्या टप्प्यात सात कॅबिनेट तर १७ राज्यमंत्र्यांचा विस्तार होणार आहे.
हे ही वाचा : कृषिमंत्र्यांचा शेतकऱ्याच्या घरी मुक्काम, ‘एक दिवस बळीराजासाठी..’ उपक्रमाचा मेळघाटातून श्रीगणेशा
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक खासदार निवडून यावेत आणि विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा भाजप युतीची सत्ता यावी यासाठी कष्ट करावे लागणार आहेत. वरिष्ठ नेत्यांना राज्यभर दौरे करून लोकांमध्ये जाता यावे, या हेतूने सध्याचे खातेवाटप झाले आहे. त्यामुळे मंत्र्यांना दिलेली खाती पुन्हा बदलतील, असे वाटत नसल्याचेही वनमंत्री मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. तरीदेखील, काही खात्यांची आदलाबदली होण्याची दाट शक्यता आहे.
नारायण राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका
शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे मोठी वाताहात झाली आहे. शिवसैनिकांनी एकत्र आणण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि युवा नेते आदित्य ठाकरे हे राज्यभरात निष्ठा यात्रा करत आहे. पण, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने टीव टीव करत हा उंदीर महाराष्ट्रभर फिरत आहे, अशा शब्दांत भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.
हे ही वाचा : Narayan Rane : नारायण राणे म्हणतात कोरोना काळात मोदींनी औषधे आणि इंजेक्शनचे शोध लावल्याने कोरोना कमी झाला
शिंदे आणि फडणवीस सरकार हे सत्तेवर आले आहे. हे पर्मनंट सरकार आहे. आधीचे कंत्राटी सरकार गणपती बाप्पाने खाली खेचले आहे. महाराष्ट्रामध्ये इतकं अपमानित होऊन कुणालाही मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं नाही. उद्धव ठाकरे यांनी फक्त 3 तास मंत्रालयामध्ये काम केलं, असं म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला, असं वृत्त दिव्य मराठीने दिले आहे.