मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पूरग्रस्तांचे सांत्वन हा एक ‘मुखवटा’,शिवसेनेची विरोधी पक्षनेत्यांचा पूरग्रस्त भागांच्या दौऱ्यावर खोचक टिप्पणी

पूरग्रस्तांचे सांत्वन हा एक ‘मुखवटा’,शिवसेनेची विरोधी पक्षनेत्यांचा पूरग्रस्त भागांच्या दौऱ्यावर खोचक टिप्पणी

शिवसेनेचं (Shivsena mouthpiece)मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून आज देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षावर तोफ डागण्यात आली आहे.

शिवसेनेचं (Shivsena mouthpiece)मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून आज देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षावर तोफ डागण्यात आली आहे.

शिवसेनेचं (Shivsena mouthpiece)मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून आज देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षावर तोफ डागण्यात आली आहे.

मुंबई, 04 ऑक्टोबर: अतिवृष्टीमुळं विदर्भ मराठवाड्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रवीण दरेकर ( Praveen Darekar) यांनी नुकसानीची पाहणी करण्यासाठी पूरग्रस्त (Flood hit areas) भागांचा दौरा केला. यावेळी फडणवीस यांनी राज्य सरकारनं (state government) शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी अशी मागणी केली. याचाच संदर्भ देत शिवसेनेचं (Shivsena mouthpiece)मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून आज देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षावर तोफ डागण्यात आली आहे.

मराठवाड्यातील पूरस्थितीविषयी एक संयमी भूमिका मांडणाऱ्या फडणवीस यांनी लगेचच देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पक्षीय राजकारण साधलेच. म्हणजे पूरग्रस्तांचे सांत्वन हा एक ‘मुखवटा’ होता आणि त्याआड दडलेले राजकारण हा ‘चेहरा’ होता का?, असा सवाल अग्रलेखातून फडणवीस यांना विचारण्यात आला आहे.

हेही वाचा- '' अन् ध्वनी प्रदूषणाला मी जबाबदार'' ,असं का म्हणाले नितीन गडकरी

पूर, दुष्काळ, अपघातप्रसंगी विरोधी पक्षाचे नेते दौरे करत असतात, तेव्हा त्यात राजकीय भागच जास्त असतो. संकटग्रस्त लोक अशा प्रसंगी अश्रूंना बांध मोकळा करून देतात व विरोधक त्याच अश्रूंचे भांडवल करून सरकारला धारेवर धरण्याची संधी घेतात, असा खोचक टोलाही विरोधी पक्ष नेत्यांना हाणला आहे.

काय आहे आजच्या अग्रलेखात

विरोधी पक्षनेत्यांनी परिस्थितीचा ‘आँखों देखा हाल’ पाहिला व आता त्यांनी याबाबत त्यांना जे वाटते ते सरकारला सांगायला हवे. शेतीचे नुकसान झाले आहेच. शेतात, घरात पुराचे पाणी शिरल्याने हाहाकार माजला. हा एक प्रकारे ओला दुष्काळ आहे व या सर्व शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली ती योग्यच आहे. महाराष्ट्रातील पुराच्या विळख्यात सापडलेला शेतकरी हा राजकारणाचा विषय नाही.

हेही वाचा- 'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेत गिरीश ओक यांची एन्ट्री, पहिल्यांदाच साकारणार भन्नाट पात्र

मराठवाडय़ातील अनेक भागांत शेतकऱ्यांची घरे, गुरे-ढोरे वाहून गेली. माणसांनी भरलेल्या ‘एस.टी.’ बस वाहून गेल्या. घरे उद्ध्वस्त झाली. चुलीही पावसाने विझल्या. तेथील जनतेचा आक्रोश अस्वस्थ करणारा आहे. शेतकऱ्यांचा संताप विमा कंपन्यांविरुद्ध आहे. दोन-दोन वेळा पिकाचा विमा उतरविल्यावरही शेतकऱ्यांना नुकसानीचा छदाम हाती लागत नाही. याच विमा कंपन्यांच्या मनमानीविरुद्ध शिवसेनेने आंदोलन केले होते व काही भागांत विमा कंपन्यांच्या कार्यालयाच्या काचा फोडून संताप व्यक्त केला होता. त्या वेळी विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी शिवसेनेपुढे गुडघे टेकून शेतकऱ्यांचे पीक विम्याचे दावे निकाली काढतो असे वचन दिले होते, पण आजही शेतकऱयांच्या हातात काहीच पडले नसेल तर सरकारने या कंपन्यांना बडगा दाखवायलाच हवा.

नैसर्गिक संकटांमुळे पिकाचे नुकसान होते तेव्हा पीक विम्याचे कवच शेतकऱ्यांचे तारणहार ठरते, पण त्या कवचालाच अनेक भोके पडली आहेत. मका, बाजरी, ज्वारी, भुईमूग, सोयाबीन, पुळीथ, मूग या पिकांचे नुकसान झाले आहे. दोन महिन्यांपूर्वी कोल्हापुरात आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, पण केंद्रीय पाहणी पथके वेळेवर आली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळू शकलेली नाही. कोल्हापूरचे शेतकरी काय सांगतात तेसुद्धा राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांनी समजून घेतले पाहिजे. ”आम्हाला आता केवळ तुमच्याकडूनच अपेक्षा आहे,” असे काही शेतकऱ्यांनी म्हणे फडणवीस व दरेकर यांना सांगितले. याचा अर्थ असा की, केंद्रातल्या मोदी सरकारने शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी ठाकरे सरकारला सढळ हस्ते मदत करावी.

हेही वाचा- पुन्हा एकदा एकनाथ खडसेंच्या वक्तव्यानं राजकीय क्षेत्रात खळबळ

फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन महाराष्ट्रासाठी मदत मागावी व राज्याचे रखडलेले पैसे आपले वजन वापरून घेऊन यावेत. शेतकरी चिंताग्रस्त आहेच. संकट अस्मानी आहे व त्याच्याशी एकजुटीने लढायला हवे. ”आमचा मराठवाडय़ाच्या पूरग्रस्त भागाचा दौरा केवळ प्रशासनाला जागे करणे, शेतकऱ्यांच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवून प्रशासनाकडून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी आहे.

First published:
top videos

    Tags: Devendra Fadnavis, Sanjay Raut (Politician), Shivsena