मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

एकनाथ खडसेंचं खळबळजनक वक्तव्य, देवेंद्र फडणवीसांसह गिरीश महाजनांवर हल्लाबोल

एकनाथ खडसेंचं खळबळजनक वक्तव्य, देवेंद्र फडणवीसांसह गिरीश महाजनांवर हल्लाबोल

एकनाथ खडसे यांनी केलेल्या खळबळजनक वक्तव्याची चर्चा होऊ लागली आहे.

एकनाथ खडसे यांनी केलेल्या खळबळजनक वक्तव्याची चर्चा होऊ लागली आहे.

एकनाथ खडसे यांनी केलेल्या खळबळजनक वक्तव्याची चर्चा होऊ लागली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

जळगाव, 04 ऑक्टोबर: एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भोसरी जमीन व्यवहारामुळे आधीच ईडीच्या चौकशीमुळे अडचणीत सापडले असताना खडसे यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करून अहवाल सादर करण्याच्या राष्ट्रीय महिला आयोगाने (womens commission) सूचना दिल्या आहेत. तर दुसरीकडे स्वतः एकनाथ खडसे यांनी केलेल्या खळबळजनक वक्तव्याची चर्चा होऊ लागली आहे.

एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ते म्हणाले की, राष्ट्रवादीत आल्यावर भाजपातील कोण गद्दार आहे ते मला कळालं. एकनाथ खडसे जळगावात बोलत होते. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरही खरमरीत टीका केली आहे.

''भाजपतील गद्दार कोण होते याची माहिती मिळाली''

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतर भाजपमध्ये कोण कोण गद्दार होते आणि माझ्या मुलीचा पराभव केला हे मला कळलं, असं एकनाथ खडसे म्हणालेत.

हेही वाचा- आज मुख्यमंत्री 12.30 वाजता शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी साधणार संवाद

तसंच इथल्या आमदारांना मी सांगतो तुम्ही कोणाच्या बळावर निवडून आला आहात. पण कुणाचं तरी ऐकायचं आणि नाथाभाऊच्या मागे ईडी लावायची. कधी अ‍ॅन्टी करप्शन लावायचं कधी इन्कम टॅक्स लावायचं. नाथाभाऊच्या घरावर दोन वेळा इन्कम टॅक्सची चौकशी झाली. रेड झाल्या, मात्र त्यात कोणतंही तथ्य नसल्याचं समोर आलं. न्यायालयात सुद्धा तसा क्लोजर रिपोर्ट दिला आहे. मात्र तरीही आता ईडी लावण्यात आली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीसांवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल

यावेळी एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही नाव न घेता हल्लाबोल केला आहे. माझा छळ करण्यात आला. मला एकाच व्यक्तीच्या सांगण्यावरुन बदनाम करण्यात आलं. तो व्यक्ती कोण आहे. माहित आहे का? गुगलवर जाऊन टरबूज ऑफ महाराष्ट्र कोण असं विचारा, असं म्हणत खडसेंनी नाव न घेता फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा-'' अन् ध्वनी प्रदूषणाला मी जबाबदार'' ,असं का म्हणाले नितीन गडकरी

गिरीश महाजनांवरही टीका

खडसेंनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावरही टीका केली आहे. गिरीश महाजन यांनी आपल्याकडे खडसे यांचे शंभर उतारे असल्याचं माध्यमांच्या पुढे म्हटलं होतं. यावर आता खडसेंनी उत्तर दिलं आहे.

महाजन यांना उत्तर देताना खडसे म्हणाले की, माझ्याकडे नाथाभाऊंचे शंभर उतारे असल्याचं काल गिरीश महाजन यांनी म्हटलं. मी त्यांना आव्हान देतो की, माझ्या खानदानी प्रॉपर्टीवर मी जे कमावले असेल, जे इन्कम टॅक्सला दाखवलं असेल त्याच्यापेक्षा एक रुपयापेक्षा जास्त पॉपर्टी असेल तर मी तुम्हाला दान करून टाकतो. अशा शब्दात खडसेंनी महाजनांना आव्हान केलं आहे.

First published:

Tags: BJP, Eknath khadse, NCP