Home /News /maharashtra /

आता या 2 बड्या नेत्यांवर शिवसेना करणार कारवाई? आज खेडमध्ये महत्त्वाची बैठक

आता या 2 बड्या नेत्यांवर शिवसेना करणार कारवाई? आज खेडमध्ये महत्त्वाची बैठक

सेनेचा बालेकिल्ला असलेल्या खेडमध्ये शिवसेनेची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. दुसरीकडे शिवसेना नेते रामदास कदम यांना आज मुंबई येथे होणाऱ्या शिवसेनेच्या बैठकीत नेते पदावरून हटवण्यात येण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी 25 जून : शिवसेनेचे अनेक आमदार बंड करत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात सामील होताना दिसत आहे. दररोज कोणी ना कोणी गुवाहाटीला जात शिंदेंच्या गटामध्ये सहभागी होताना दिसत आहे. यामुळे ठाकरे सरकारची चिंता वाढली आहे. महाविकास आघाडी सरकार वाचवण्याआधी स्वतःचा पक्ष वाचवण्याचं मोठं काम आता शिवसेनेसमोर आहे. अशात आता शिवसेनेनं बंडखोर आमदारांवरच कारवाईचं पाऊल उचललं आहे. 'तुम्ही तुमची इज्जत घालवली तेवढी पुरे, निघा आता' आसाम पूर परिस्थितीवरून काँग्रेसने शिंदेंना फटकारलं खेड विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे आमदार योगेश कदम सेनेशी बंड करत एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. यानंतर आता आज त्यांचा मतदारसंघ असलेल्या आणि सेनेचा बालेकिल्ला असलेल्या खेडमध्ये शिवसेनेची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. दुसरीकडे शिवसेना नेते रामदास कदम यांना आज मुंबई येथे होणाऱ्या शिवसेनेच्या बैठकीत नेते पदावरून हटवण्यात येण्याची शक्यता आहे. त्याबाबतही या बैठकीत चर्चा होणार आहे. रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांचं गाव असलेल्या खेडमध्ये या सर्वाचे काय पडसाद उमटतात आणि शिवसैनिक नेमकी काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय, स्पेशल टीम पडणार गुवाहाटीबाहेर, पुन्हा गुजरात मुख्य केंद्र दरम्यान महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi) शिवसेनेच्या (Shiv Sena) बंडखोर आमदारांना सर्वात मोठा धक्का दिला आहे. महाविकास आघाडी सरकारने शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना अखेर अपात्र ठरवण्याबाबत नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित नोटीस बजावण्यात आल्यानंतर बंडखोर आमदारांना 48 तासांची मुदत असेल. या दरम्यान त्यांना आपली भूमिका मांडण्यासाठी संधी असेल. त्यानंतर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होईल.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Eknath Shinde, Shivsena

पुढील बातम्या