मुंबई, 25 जून : शिवसेनेचे (shvisena) नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) गेल्या तीन दिवसांपासून शिवसेनेच्या आमदारांना घेऊन आसाममधील गुवाहाटीमध्ये मुक्कामी आहे. आधीच आसाममध्ये पूरपरिस्थिती आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र सरकार अडचणीत आणलं आहे, पण आमचे राज्य नका अडचणीत आणू नका, निघा आता, असा सणसणीत टोला आसामच्या (asam) काँग्रेसने लगावला आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ३३ आमदार फोडून सुरत व्हाया गुवाहाटी गाठले आहे. मागील पाच दिवसांपासून हे बंडखोरांचे नाट्य सुरू आहे. गुवाहाटीमधील ‘रॅडिसन ब्लू’ हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आणि सेनेचे आमदार तळ ठोकून आहे. खुद्द आसामधील भाजपचे नेते एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठी घेत असल्यामुळे पूर्ण मदत करत असल्याचे समोर आले आहे. भाजपच्या या भूमिकेवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेन कुमार बोरा यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून खडेबोल सुनावले आहे.
महाराष्ट्र अडचणीत आणलाच शिंदेजी,आता आसामसुद्धा अडचणीत आणू नका. पूरपीडित लोकांना मदत देण्यापेक्षा आपल्या सरबराई मध्ये आमचं सरकार व्यस्त आहे,हे महाराष्ट्राला शोभत नाही.तुम्ही तुमची घालवली तेवढी इज्जत पुरे आहे .निघा आता.
— Atul Londhe Patil (@atullondhe) June 24, 2022
-भूपेन कुमार बोरा,
प्रदेशाध्यक्ष, आसाम कांग्रेस. pic.twitter.com/2IWUu4B9y7
महाराष्ट्र अडचणीत आणलाच शिंदेजी,आता आसामसुद्धा अडचणीत आणू नका. पूरपीडित लोकांना मदत देण्यापेक्षा आपल्या सरबराई मध्ये आमचं सरकार व्यस्त आहे,हे महाराष्ट्राला शोभत नाही. तुम्ही तुमची घालवली तेवढी इज्जत पुरे आहे. निघा आता’अशी टीका आसाम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेन कुमार बोरा यांनी लगावला आहे. एकनाथ शिंदे हे आधी गुजरातमधील सुरतमध्ये मुक्कामी होते. पण, महाराष्ट्रापासून अंतर जवळ असल्यामुळे दुसऱ्याच दिवशी भल्या पहाटे एकनाथ शिंदे हे सर्व आमदारांना घेऊन गुवाहाटीला रवाना झाले होते. यावेळी भाजपचे नेते सुद्धा सोबत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे भाजप एकनाथ शिंदेंच्या बंडाला रसद आणि सुरक्षा पुरवत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, दुसरीकडे, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून एकनाथ शिंदे यांच्या बंडावर टीका करण्यात आली आहे. सुरतच्या ‘मेरिडिअन’ हॉटेलमध्ये अर्धवट राहिलेले ‘चिंतन’ कार्य अखेर ईशान्येकडील गुवाहाटी शहरात मार्गी लागले. गुवाहाटीस्थित ‘रॅडिसन ब्लू’ योग शिबिरात महाराष्ट्रातील चाळिसेक आमदारांचे सखोल चिंतन शिबीर सुरू आहे. त्या शिबिरात असा ठराव संमत झाला की, ‘‘भारतीय जनता पक्ष एक महाशक्ती आहे. ही महाशक्ती आपल्या पाठीशी असल्याने आपल्याला चिंता नाही.’’ शिवसेनेचे पळवून नेलेले चाळिसेक आमदार गुवाहाटीमध्ये असून त्यांची चोख व्यवस्था भारतीय जनता पक्षाने केल्याने या महाशक्तीचा काही जणांना नव्याने साक्षात्कार झालेला दिसतो. योग शिबिराच्या प्रमुखांनी त्यांची भूमिका अधिक सुस्पष्ट करताना जाहीर केले की, ‘‘भाजप या महाशक्तीने पाकिस्तानला धडा शिकवला आहे. त्या महाशक्तीचा आपल्याला पाठिंबा आहे.’’ आसामातून अनेक दिव्य विचार सध्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचत आहेत. हिंदुत्वापासून स्वाभिमानापर्यंत नव्याने साक्षात्कार होत आहेत. बरं, या महाशक्तीने पाकिस्तानला धडा शिकविला म्हणजे काय केले? योग शिबिरातील मंडळींना पाकिस्तानबाबत जे ज्ञान मिळत आहे, त्यावर काय बोलावे? पाकिस्तानची जिरवली किंवा पाकिस्तानला धडा शिकवल्याचे कोणते नवे पुरावे गुवाहाटीच्या योग शिबिरात समोर आणले? कश्मीरात पाकिस्तानची घुसखोरी कायम आहेच, पण मोठय़ा प्रमाणात हिंदू पंडितांचे हत्याकांड सुरू आहे. हिंदूंनी पलायन केले व जाताना भारतीय जनता पक्षाला शाप दिले. स्वतःस हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे सरकार दिल्लीत असताना कश्मीरमधून हिंदूंना पलायन करावे लागते, हीच काय तुमची महाशक्ती? असा सणसणीत टोला सेनेनं शिंदेंना लगावला.