मुंबई, 12 ऑक्टोबर : उद्धव ठाकरे यांच्यासमोरच्या अडचणी कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे पुन्हा अडचणीत आले आहेत. एकाच दिवशी घडलेल्या चार घटनांमुळे उद्धव ठाकरेंची कोंडी झाली आहे. या चक्रव्यूहातून ठाकरे कसे बाहेर पडणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे. चिन्ह आणि पक्षाला नवीन नाव मिळाल्यानंतरही उद्धव ठाकरेंच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ज्या अंधेरी पोटनिवडणुकीसाठी नवीन चिन्ह आणि नाव मिळालं, ठाकरेंनी उमेदवारही घोषित केला, पण त्यांच्या उमेदवाराचा राजीनामा स्वीकारला गेलेला नाही. ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर झाला नाही, तर त्यांची उमेदवारी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. हेही वाचा ऋतुजा लटकेंचा राजीनामा का लटकला? त्या अटीमुळे ठाकरे पुन्हा अडचणीत! मशाल चिन्ह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना देण्यात आलं, त्यावरही आता वाद निर्माण झाला आहे. समता पार्टीने मशाल चिन्हावर दावा केला आहे, याबद्दल त्यांनी निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली आहे. हेही वाचा उद्धव ठाकरेंची डोकेदुखी पुन्हा वाढली, धनुष्यबाण गेलं आता मशालवर नवा दावा महाप्रबोधन यात्रेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत, नेते भास्कर जाधव, सुषमा अंधारे यांच्यासह 7 जणांना पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. हेही वाचा ठाकरेंची महाप्रबोधन यात्रा अडचणीत, 7 जणांना पोलिसांची नोटीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर बोगस प्रतिज्ञापत्राबाबत झालेल्या आरोपांनंतर आता चौकशी सुरू आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी मुंबई क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांकडून तपास केला जात आहे, त्यामुळे आता उद्धव ठाकरेंवरचं शुक्लकाष्ठ काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. हेही वाचा मुंबई क्राईम ब्रँच कोल्हापुरात, ठाकरे गटाने बोगस प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा आरोप
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.