जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Mumbai Crime Branch : मुंबई क्राईम ब्रँच कोल्हापुरात, ठाकरे गटाने बोगस प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा आरोप

Mumbai Crime Branch : मुंबई क्राईम ब्रँच कोल्हापुरात, ठाकरे गटाने बोगस प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा आरोप

Mumbai Crime Branch : मुंबई क्राईम ब्रँच कोल्हापुरात, ठाकरे गटाने बोगस प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा आरोप

कोल्हापूरमध्ये मुंबई क्राईम ब्रँचचे एक पथक कोल्हापुरात दाखल झाले. ठाकरे गट समर्थनात सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रातील काही प्रतिज्ञापंत्रांना आक्षेप असल्याची तक्रार

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

कोल्हापूर, 12 ऑक्टोंबर : मागच्या दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाकडून ठाकरे गटावर बोगस प्रतिज्ञा पत्र दिल्याचा आरोप केला होता. यावर कोल्हापूरमध्ये मुंबई क्राईम ब्रँचचे एक पथक आज (दि.12) सकाळी कोल्हापुरात दाखल झाले. ठाकरे गट समर्थनात सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रातील काही प्रतिज्ञापंत्रांना आक्षेप असल्याची तक्रार मुंबईच्या निर्मलनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. यावरून खातरजमा करण्यासाठी दोन अधिकारी, दोन कर्मचारी असे चौघांचे पथक आज कोल्‍हापुरात दाखल झाले आहे.

जाहिरात

ठाकरे आणि शिंदे गटाने शिवसेना नावावर तसेच धनुष्यबाण चिन्हावर दावा केला होता. यासाठी जिल्ह्यानुसार पदाधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र पाठवली होती. दरम्यान ठाकरे गटाकडून बोगस प्रतिज्ञापत्र (अपेडेव्हीट) सादर करण्यात आल्याची तक्रार दाखल झाल्याने मुंबई क्राईम ब्रँचचे एक पथक कोल्हापुरात आले असून, याची माहिती घेत आहेत. पोलीस मुख्यालयात या पथकाने माहिती घेतली.

हे ही वाचा :  CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांची ठाणेकरांना दिवाळी भेट, मुंबईपेक्षा ठाण्याचे महत्त्व वाढणार 17 हजार कोटींची कामे होणार

ठाकरे गटाकडून सादर प्रतिज्ञापत्रांना आक्षेप घेण्यात आला असून, राज्यात 4 ठिकाणी तपासणी सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी दीपक सावंत यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?

उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देत असल्याची अनेक शपथपत्र मुंबईत एकाच ठिकाणी आढळून आली होती. त्यानंतर शिंदे गटाकडून ही सर्व शपथपत्रे बनावट असल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता हे प्रकरण आता गुन्हे शाखेकडे (क्राईम ब्रांच) वर्ग करण्यात आले आहे. सध्या राज्याच्या राजकारणात चालू असलेल्या घटनामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  Sushama Andhare Shiv Sena : शिवसेनेची मुलखमैदान तोफ सुषमा अंधारेंवर गुन्हा दाखल, अंधारेंची पहिलीच प्रतिक्रीया

स्टॅम्प पेपरचा वापर करुन ही शपथपत्र बनवण्यात आली होती. ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी याबाबत एका व्हिडीओतून आरोपसुद्धा केला होता. मात्र, आता गुन्हे शाखेच्या तपासातून या शपथपत्रांबाबत नेमका काय खुलासा होतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. नोटरी करण्यांनीच शपथपत्र बनवल्याचे समोर आले आहे. त्यानंतर एकच खळबळ उडाली.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात