मुंबई, 12 ऑक्टोंबर : शिवसेनेची आरोपांचे खंडण करणारे शिवसेनेवर असलेला प्रत्येक वार झेलणारे खासदार संजय राऊत यांच्यानंतर शिवसेनेची जोरदारपणे बाजू मांडणाऱ्या सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. दसरा मेळाव्यात तडाखेबाज भाषण करून विरोधकांना घायाळ करणाऱ्या सुषमा अंधारे यांच्यासह खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, मधुकर देशमुख आणि अनिता बिर्जे यांच्यावर कलम 153 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाकरे गटाकडून महाप्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ठाकरे गटाकडून शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली जात आहे. याद्वारे ठाकरे गटाच्या नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये सुषमा अंधारेंचे नाव आघाडीवर आहे. या सगळ्या प्रकरणावर शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे मोजक्याच शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही कायदा पाळणारे लोक आहोत, तरीसुद्धा राज्य शासनाने दाखल केलेला हा गुन्हा शुभशकुन असल्याचं अंधारे यांनी म्हणाल्या.
हे ही वाचा : ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं; अंधेरी पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट
महाप्रबोधन यात्रेच्या उद्घाटन सभेतील वक्ते म्हणून मी स्वतः, खासादर राजन विचारे, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव आणि आमच्या अनिताताई बिर्जे अशा पाच जणांवर 153 नुसार गुन्हा दाखल झाल्याचे समजते. आम्ही कायदा पाळणारे लोक आहोत तरीसुद्धा राज्य शासनाने दाखल केलेला हा गुन्हा शुभशकुन आहे. अशी माहिती सुषमा अंधारे यांनी दिली आहे.
सुषमा अंधारे यांच्यासह विनायक राऊत, भास्कर जाधव, मधुकर देशमुख आणि अनिता बिर्जे यांच्यावर कलम 153, 500 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मागच्या दोन दिवसांपूर्वी ठाण्यातील टेंभीनाका येथे शिवसेनेच्या ठाकरे गटाची महाप्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळ्यातील भाषणात सुषमा अंधारे आणि भास्कर जाधव यांनी मानहानीकारक वक्तव्य केल्याचा आरोप ठेवत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा : उद्धव ठाकरेंची डोकेदुखी पुन्हा वाढली, धनुष्यबाण गेलं आता मशाल चिन्हावर ‘या’ पक्षाचा दावा
या मेळाव्यात सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली होती. तर भास्कर जाधव यांनी भाजप नेते गिरीष महाजन यांची नक्कल केली होती. यातून बदनामी झाल्याचा आरोप ठेवत त्यांच्यावर ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिंदे गटाचे बाळा गवस यांनी याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीनुसार सर्व नेत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.