तुषार रुपनवार, प्रतिनिधी मुंबई, 17 जुलै : शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदार अपात्रतेसंदर्भात नोटीस देण्याची मुदत संपली आहे. शिवसेनेच्या 40 आमदारांकडून विधिमंडळाच्या नोटीसला उत्तर देण्यात आलं आहे, पण ठाकरे गटाच्या आमदारांकडून विधिमंडळाच्या नोटीसला केराची टोपली दाखवण्यात आली आहे, अशी माहिती विधिमंडळातल्या खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या एकाही आमदाराने नोटीसला उत्तर दिलं नाही, उत्तर न दिलेल्या आमदारांना आता सुनावणीसाठी बोलावण्यात येणार आहे. पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर अध्यक्ष ठाकरे गटाच्या आमदारांना सुनावणीसाठी बोलावणार आहेत. अजितदादांसोबतच्या आमदारांना भेटल्यावर शरद पवार काय म्हणाले? बैठकीतली Inside Story शिवसेना कुणाची हा वाद पहिले सुप्रीम कोर्टात आणि मग निवडणूक आयोगात गेला. यानंतर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिलं. दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदेंच्या पक्षाने भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती बेकायदेशीर ठरवली होती. तसंच प्रतोद नेमताना पक्ष कुणाचा आहे हे पाहून निर्णय घ्यावा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते.
शिवसेनेमध्ये झालेल्या बंडानंतर दोन्ही गटांकडून एकमेकांना व्हीप जारी करण्यात आले होते, यानंतर दोन्ही गटांकडून एकमेकांना अपात्रतेविषयीची नोटीस पाठवण्यात आली होती. या नोटीसबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उत्तर मागितलं होतं. निलम गोऱ्हेंच्या अडचणीत वाढ; ‘मविआ’च्या शिष्टमंडळानं घेतली राज्यपालांची भेट