जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Sharad Pawar : अजितदादांसोबतच्या आमदारांना भेटल्यावर शरद पवार काय म्हणाले? बैठकीतली Inside Story

Sharad Pawar : अजितदादांसोबतच्या आमदारांना भेटल्यावर शरद पवार काय म्हणाले? बैठकीतली Inside Story

राष्ट्रवादीच्या आमदारांना शरद पवार काय म्हणाले?

राष्ट्रवादीच्या आमदारांना शरद पवार काय म्हणाले?

अजित पवारांसोबत गेलेले राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना वाय.बी.चव्हाण सेंटरला भेटले. विशेष म्हणजे काल राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी पवारांची भेट घेऊन त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न केला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

वैभव सोनवणे, प्रतिनिधी मुंबई, 17 जुलै : अजित पवारांसोबत गेलेले राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना वाय.बी.चव्हाण सेंटरला भेटले. विशेष म्हणजे काल राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी पवारांची भेट घेऊन त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न केला. तर आज तब्बल 32 आमदारांनी पवारांची मनधरणी केल्याचं प्रफुल्ल पटेलांनी म्हटलं आहे. पक्ष एकसंध राहावा यासाठी शरद पवारांना विनंती केल्याचं त्यांनी म्हटलंय. विधीमंडळाचं अधिवेशन सुरू असल्याने सर्व आमदार मुंबईत असल्याने पवारांची भेट घेतल्याचं बैठकीनंतर प्रफुल पटेल यांनी सांगितलं. ‘सर्व आमदारांनी साहेबांचा आशिर्वाद घेतला, कालसारखीच विनंती आजही केली. पक्ष एकसंध राहावा यासाठी विचार करावा, अशी विनंती पवार साहेबांकडे केली. पवार साहेबांनी काल आणि आज आमचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांच्या मनात काय आहे हे कसं सांगू शकतो,’ अशी प्रतिक्रिया प्रफुल पटेल यांनी दिली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शरद पवार गटाचे 9 आमदार उपस्थित; अजितदादांकडे किती आमदार? काय म्हणाले शरद पवार? या भेटीमध्ये शरद पवारांनी आमदारांसोबत संवाद साधला. इतके दिवस आपण भाजपविरोधात बोललो, काम केलं, आता मला रस्ता दिसत नाही, असं शरद पवारांनी आमदारांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

शरद पवारांना राष्ट्रवादीचे आमदार वाय.बी.चव्हाण सेंटरला येणार असल्याची कल्पना नव्हती. शरद पवार यायच्या आधीच सगळे आमदार तिकडे पोहोचले होते. शरद पवार पोहोचल्यानंतर त्यांच्यात आणि अजित पवार-प्रफुल पटेल यांच्यात 20 मिनिटं चर्चा झाली. या 20 मिनिटांमध्ये आमदारांच्या हॉलमध्ये सुप्रिया सुळे आणि मग रोहित पवार येऊन गेले आणि ते आमदारांशी बोलले. यानंतर सुप्रिया सुळे-रोहित पवार एकत्र येऊन आमदारांशी चर्चा करून गेले. यानंतर शरद पवार आमदार उपस्थित असलेल्या हॉलमध्ये आले, जवळपास सात मिनिटं शरद पवार तिकडे होते. यावेळी दोन ते तीन आमदारांनी त्यांच्यासमोर निवेदनं केली आणि आशिर्वाद द्या, असं आमदार म्हणाले. शरद पवारांनी हे सगळं ऐकून घेतलं आणि त्यांनी आपण इतके दिवस भाजपविरोधात काम केलं आहे, बोललो आहे. आता मला काही रस्ता दिसत नाही, असं ते म्हणाले. निलम गोऱ्हेंच्या अडचणीत वाढ; ‘मविआ’च्या शिष्टमंडळानं घेतली राज्यपालांची भेट

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात