मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुढची मुख्यमंत्री महिलाच असेल; उद्धव ठाकरेंच्या विधानाने पुन्हा चर्चांना उधाण

पुढची मुख्यमंत्री महिलाच असेल; उद्धव ठाकरेंच्या विधानाने पुन्हा चर्चांना उधाण

महिला मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न आल्यावर महाविकास आघाडीतील कोणत्या महिलेला महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळणार, यासंबंधीच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

महिला मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न आल्यावर महाविकास आघाडीतील कोणत्या महिलेला महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळणार, यासंबंधीच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

महिला मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न आल्यावर महाविकास आघाडीतील कोणत्या महिलेला महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळणार, यासंबंधीच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Khushalkant Dusane

मुंबई, 1 डिसेंबर : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ही चर्चा अनेकदा आजही रंगताना दिसते. कोण होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री याची वाट अजूनही संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. यातच आता शिवसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एका वक्तव्यानंतर पुन्हा या चर्चांना उधाण आले आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे -

लहुजी वस्तादांच्या जयंती कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी केलेल्या एका वक्तव्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा त्याच चर्चेला उधाण आले आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्याला एक कर्तृत्ववान मुख्यमंत्री खुर्चीवर बसवायचा आहे. मग तो पुरुष असो किंवा स्त्री, असे त्यांनी म्हटले. यानंतर राज्यात जर महिला मुख्यमंत्री झाल्या तर कोण? यावर चर्चा सुरू झाली आहे. महिला मुख्यमंत्रीपदाच्या काही प्रबळ उमेदवार कोण असतील ते जाणून घेऊयात.

महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री कोण असतील, अशी चर्चा सुरू झाल्यावर सर्वात पहिले नाव समोर येते ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे. यानंतर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याही नावाची चर्चा होते. पण यानंतर तिसरा चेहरा हा कोण असेल, याबाबत इतकी चर्चा होताना दिसत नाही. यानंतर आता जसे उद्धव ठाकरे हे अचानक मुख्यमंत्री झाले, तसेच त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या सुद्धा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असू शकतात.

त्यामुळे महिला मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न आल्यावर महाविकास आघाडीतील कोणत्या महिलेला महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळणार, यासंबंधीच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

हेही वाचा - बेईमान व्यक्तींची शिवरायांशी तुलना हा तर महाराष्ट्राचा अपमान, संजय राऊत लोढांवर भडकले

सुप्रिया सुळे -

मागील 15 वर्षांपासून खासदार सुप्रिया सुळे या राजकारणात सक्रीय आहेत. त्या पहिल्यांदा 2006 मध्ये महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून आल्या होत्या. यानंतर 2009 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आल्या होत्या. 2014 आणि 2019 या दोन्ही वेळा मोदी लाट असतानाही सुप्रिया सुळे लोकसभेवर निवडून गेल्या.

पंकजा मुंडे -

सुप्रिया सुळेंसोबतच महिला मुख्यमंत्री म्हणून चर्चा सुरू होते, तेव्हा पंकजा मुंडेंच्या नावाचीही चर्चा होते. 2009मध्ये त्या पहिल्यांदा परळीच मतदार संघातून विधानसभेवर निवडून गेल्या होत्या. यानंतर पंकजा मुंडे यांनी 2012मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं. 2014मध्ये पुन्हा त्या विधानसभेवर निवडून आल्या होत्या. यानंतर त्यांना ग्रामविकास, महिला बालकल्याण खात्याचे कॅबिनेट मंत्री बनविण्यात आले होते. मी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहे, असे वक्तव्यही त्यांनी केल्यामुळे त्यांची मुख्यमंत्रीपदाबद्दलची महत्त्वाकांक्षा याबाबत चर्चा सुरू झाली होती.

रश्मी ठाकरे - 

या यादीत अजून तिसरं प्रभावी नाव समोर आलेलं नाही. मात्र, ज्याप्रकारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. तसेच उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचेसुद्धा नाव या यादीत घेता येईल. शिवसेनेत रश्मी ठाकरेंकडे कुठलेही अधिकृत पद नाही. मात्र, पक्ष आणि पक्षांतर्गत निर्णयांमध्ये त्यांचा प्रभाव असतो. तसेच याबाबत चर्चाही होते. म्हणून महाविकास आघाडीने बहुमत मिळवल्यानंतर महिला मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत रश्मी ठाकरेंच्याही नावाची चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

First published:

Tags: Maharashtra political news, Pankaja munde, Supriya sule, Uddhav Thackeray