मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शिवाजी महाराजांचा पुतळा सरकारनं रातोरात हटवला, शिवभक्तांमध्ये संतापाची लाट

शिवाजी महाराजांचा पुतळा सरकारनं रातोरात हटवला, शिवभक्तांमध्ये संतापाची लाट

स्थानिक ग्रामपंचायतीची या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला परवानगी असतानाही तो सरकारनं हटवला

स्थानिक ग्रामपंचायतीची या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला परवानगी असतानाही तो सरकारनं हटवला

स्थानिक ग्रामपंचायतीची या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला परवानगी असतानाही तो सरकारनं हटवला

कोल्हापूर, 8 ऑगस्ट: बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवण्यात आला आहे. या घटनेमुळे शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शिवभक्त रविवारी (9 ऑगस्ट) कर्नाटकात जाऊन आंदोलन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा...दीपक साठेंनी जीवाची बाजी लावून वाचवले प्रवाशांचे प्राण, वाचा भावाची FB पोस्ट

बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. मात्र, पुतळा हटवण्यासाठी पोलिसांनी दबाब आणला होता. मनगुत्ती येथील नागरिक यासाठी रस्त्यावर उतरले होते. तेव्हा कुठे पोलिसांचा दबाब कमी झाला होता. मनगुत्ती ग्रामपंचायतीच्या परवानगीनं शिवाजी महाराजांच्या पुतळा बसवण्यात आला आहे. मात्र, आता हाच पुतळा कर्नाटक सरकारनं हटवला आहे.

सरकारच्या आदेशानंतर रातोरात पोलिस बंदोबस्तात पुतळा हटवण्यात आला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कर्नाटक सरकारला वावडे का?, असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.

मिळालेली माहिती अशी की,  बेळगाव जिल्ह्यातील मनगुती या गावात ग्रामपंचायतीच्या ठरावानं छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा बसवला होता. मात्र, शुक्रवारी अचानक बेळगाव जिल्हा प्रशासनानं रातोरात हा पुतळा हटवला. गावातील दुसऱ्या गटातील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली. त्यानंतर हा पुतळा हटवण्यात आला. त्यामुळं या भागात तणावाच वातावरण निर्माण झालं.

विविध ठिकाणी या संदर्भात आंदोलनं करण्यात येत आहेत. सोमवारपर्यंत महाराजांचा पुतळा पुन्हा बसवला नाही तर मनगुत्तीमध्ये जाऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा सीमा भागातील मराठी बांधवांनी दिला आहे. गावकऱ्यांनी यासंदर्भात जाब विचारण्यासाठी ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता त्याठिकाणी गर्दी केली. दरम्यान कर्नाटक सरकारनं शिवाजी महाराजांचा हटवलेला पुतळा त्वरित उभा करावा, अन्यथा महाराष्ट्रातील शिवभक्त कर्नाटकात घुसतील, अशा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या नूल गावातल्या गावकऱ्यांनी हा इशारा दिला आहे.

'संजय राऊत हे रावणासारखे राक्षस'

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गेल्या जानेवारी महिन्यात बेळगाव दौऱ्याला गेले होते. संयज राऊत यांच्या या दौऱ्याला कर्नाटक नवनिर्माण सेनेनं जोरदार विरोध केला होता. 'संजय राऊत हे कोणत्याही परिस्थितीमध्ये बेळगावमध्ये येऊ नयेत. कर्नाटक सरकार आणि बेळगाव प्रशासन कसं यांना परवानगी देते?' असा सवाल कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर यांनी केला होता.

हेही वाचा...कोरोनाचा वाढता धोका, पुणे- मुंबई येथील परीक्षा केंद्रावरून विद्यार्थ्यांसमोर पेच

खासदार संजय राऊत हे रावणासारखे राक्षस असून बेळगावातील वातावरण बिघडवण्यासाठी ते बेळगावात येत आहेत, अशी विखारी टीकाही कर्नाटक नवनिर्माण सेनेनं केली होती. 'सूर्य चंद्र असेपर्यंत बेळगाव हे कर्नाटकाचा भाग असेल,' असं वक्तव्य कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षांनी केलं होतं.

First published:

Tags: Kolhapur, Shivaji maharaj, Shivaji maharaj statue