मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /वैमानिक दीपक साठेंनी जीवाची बाजी लावून वाचवले प्रवाशांचे प्राण, भावानं FB वर व्यक्त केल्या भावना

वैमानिक दीपक साठेंनी जीवाची बाजी लावून वाचवले प्रवाशांचे प्राण, भावानं FB वर व्यक्त केल्या भावना

या अपघातात विमानाचे पायलट कॅप्टन दीपक साठे यांचाही मृत्यू झाला आहे. विश्लेषणासाठी विमानाचे ब्लॅक बॉक्स पाठविण्यात आले आहेत.

या अपघातात विमानाचे पायलट कॅप्टन दीपक साठे यांचाही मृत्यू झाला आहे. विश्लेषणासाठी विमानाचे ब्लॅक बॉक्स पाठविण्यात आले आहेत.

दीपक साठे आणि त्यांचे सहकारी अखिलेश कुमार यांना जीवाची बाजी लावून अनेक प्रवाशांचे प्राण वाचवल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई, 8 ऑगस्ट: केरळमध्ये शुक्रवारी झालेल्या भीषण विमान अपघातातील मृतांचा आकडा 18 वर पोहोचला आहे. मृतांमध्ये अनुभवी वैमानिक दीपक साठे यांचा समावेश आहे.

दीपक साठे आणि त्यांचे सहकारी अखिलेश कुमार यांना जीवाची बाजी लावून अनेक प्रवाशांचे प्राण वाचवल्याची माहिती समोर आली आहे. आपला प्रदीर्घ अनुभव पणाला लावून दीपक साठे आणि अखिलेश कुमार यांनी प्रसंगावधान राखूव कमीत कमी जिवीतहानी होईल, याची खबकदारी घेतली होती, मात्र अखेर या प्रयत्नात दोघांचा मृत्यू झाला, असं दीपक साठे यांचे चुलत बंधू निलेश साठे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

हेही वाचा...Air Crsh: भीषण अपघातात घडला चमत्कार, आणि आई-वडिलांच्या डोळ्यांना लागल्या धारानिलेश साठे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'दुबईहून केरळमध्ये आलेल्या विमानाचे लँडिंग गिअर काम करत नव्हते. हिंदूस्थानच्या हवाई दलाचे माजी वैमानिक दीपक साठे विमानतळाभोवती तीन फेऱ्या मारत विमानातील इंधन संपवलं होतं. यामुळे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर विमानाला आग लागणार नाही. यामुळे विमान दुर्घटनेनंतर धुराचे लोळ उठलेले दिसले नाहीत. विमान लँड करण्याच्या आधीत दीपक साठे यांनी इंजिन बंद केलं होतं. विमान धावपट्टीवर तीनदा आदळल्यानंतर विमानाच्या मध्यभाग जमिनीला टेकला होता. विमानाचा उजवा पंख क्षतिग्रस्त झाला होता.

पुढे निलेश साठे म्हणाले की, परदेशात अडकलेल्या हिंदुस्थानींना मायदेशात परत आणत असल्याच दीपक साठे यांनी सार्थ अभिमान होता. दीपक यांच्यासोबत झालेल्या अखेरच्या संभाषणाचाही निलेश यांनी आपल्या पोस्टमध्ये उल्लेख केला आहे. संबंधित देशामध्ये विमान जात असताना ते रिकामं जात असतं का? या माझ्या प्रश्नावर दीपक म्हणाले होते, नाही, विमान कधीच रिकामं जात नाही. त्यात भाज्या, फळं आणि औषधे लादून नेली जातात, असं त्यांनी सांगितलं होतं.'

कॅप्टन दीपक वसंत साठे हे माजी वायुसेना पायलट होते. त्यांना अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनीही गौरवण्यात आले होते. एअर फोर्समधले एक कुशल लढाऊ पायलट असा त्यांचा लौकिक होता.

हेही वाचा...निष्णात पायलट होते कॅप्टन साठे, 22 वर्षांच्या अनुभवाआधी Airforce मध्येही सेवा

दरम्यान, देशासाठी कालचा दिवस हा ब्लॅक फ्रायडे ठरला. 'वंदे भारत मिशन' अंतर्गत दुबईहून केरळला आलेल्या एअर इंडियाच्या IX 1344 विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला असून 123 जण जखमी आहेत. कोझिकोड विमानतळ हे टेबल टॉप एअरपोर्ट आहे. त्यामुळे इथे विमान उतरत असताना धावपट्टीवर खूपच काळजीपूर्वक उतरवावं लागतं. त्यातच शुक्रवारी मुसळधार पावसामुळे रनवेवर पाणी होतं आणि पावसाचा जोर वाढल्यानं धुसर दिसत होतं. विमान धावपट्टीवरून घसरून ते 35 फूट खोल खाली कोसळलं. विमानाचे दोन तुकडे झाले. या विमानात 170 प्रवासी होते.

First published: