कोरोनाचा वाढता धोका... पुणे-मुंबई येथील परीक्षा केंद्रावरून विद्यार्थ्यांसमोर नवा पेच

कोरोनाचा वाढता धोका... पुणे-मुंबई येथील परीक्षा केंद्रावरून विद्यार्थ्यांसमोर नवा पेच

पुण्यात कोरोनाचा वाढता धोका यात वाहतुकीची सुविधा नाही. मग परीक्षा केंद्रांवर पोहोचायचं तरी कसं?

  • Share this:

बीड, 8 ऑगस्ट: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा जवळ आल्या आहेत. मात्र, परीक्षा केंद्र पुणे आणि मुंबई या ठिकाणी आहेत. पुण्यात कोरोनाचा वाढता धोका यात वाहतुकीची सुविधा नाही. मग परीक्षा केंद्रांवर पोहोचायचं तरी कसं? राज्यातील इतर जिल्ह्यातून विद्यार्थ्यांनी परीक्षेला येण्यासाठी आता विरोध दर्शवला आहे.

हेही वाचा...वैमानिक दीपक साठेंनी जीवाची बाजी लावून वाचवले प्रवाशांचे प्राण, भावानं FB वर व्यक्त केल्या भावना

परीक्षा केंद्र हे स्व जिल्ह्यात उपलब्ध करून देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. मराठवाड्यातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पुणे- मुंबईत स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी जातात. मात्र कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थ्यांसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. परीक्षा देता येते की नाही अशी चिंता विदयार्थ्यांना सतावत आहे.

राज्य सेवेच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. मात्र परीक्षा केंद्रावर कसं जाणार, हा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकला आहे. पुण्यामध्ये इतर जिल्ह्यांमधून तयारी करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी पुण्यात केंद्र तर निवडलं आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे बससेवा बंद आहे. आता पुण्याला कसं जायचं हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. यातून काहीतरी मार्ग काढावा, अशी मागणी विद्यार्थ्याकडून केली जात आहे.

हेही वाचा...90 वर्षांच्या आजीला काळोख्या जंगलात टाकून दिले, औरंगाबादेतील लाजीरवाणी घटना

बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी बीड जिल्ह्यातच केंद्र परीक्षेसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावात प्रवास करणं शक्य नाही. त्याचबरोबर परीक्षा टाळता येणंही शक्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होईल, अशा अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांनी स्व जिल्ह्यातच परीक्षा केंद्र उपलब्ध करून द्यावं, अशी मागणी केली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: August 8, 2020, 1:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading