Home /News /maharashtra /

राजकारणाची दिशा बदलणार! कोल्हापूर महापालिकेवर भगवा फडकवण्याचा सेनेचा इरादा

राजकारणाची दिशा बदलणार! कोल्हापूर महापालिकेवर भगवा फडकवण्याचा सेनेचा इरादा

कोरोनाचं संकट आटोक्यात येताच कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे.

कोल्हापूर, 8 नोव्हेंबर: कोरोनाचं संकट (Coronavirus) आटोक्यात येताच कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या (Kolhapur Municipal Corporation Election) हालचालींना वेग आला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक येत्या जानेवारी महिन्यात होऊ शकते. त्यामुळे ऐन थंडीच्या दिवसांत राजकीय रणधुमाळीमुळे कोल्हापुरातील वातावरण तापणार आहे. शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh kshirsagar) यांनी मेळावा घेत महापालिकेवर भगवा फडकवण्याचा इरादा स्पष्ठ केला आहे. कोणत्याही परिस्थितीत महानगरपालिकेवर भगवा फडकवणारच, असं माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मेळाव्यात कार्यकर्त्यांनी संबोधित करताना सांगितलं. हेही वाचा..सासऱ्यांनंतर सूनबाईही राष्ट्रवादीच्या वाटेवर? बड्या नेत्याकडून रक्षाताईंचं कौतुक दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसनं (NCP) स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. मात्र, काँग्रेसनं (Congress) अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे या निवडणुकीमुळे राज्यातील राजकारणाची दिशा बदणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तयारीला लागा.. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांनी कार्यकर्त्याना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. दरम्यान, कोल्हापूर महापालिकेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. मात्र, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसनं एकला चलो रेची भूमिका स्पष्ट केली आहे. यावर आता काँग्रेस काय निर्णय घेते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादी ही निवडणूक स्वबळावर लढणार असली तरी निकालानंतर पुन्हा आघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकहाती भगवा फडकेल... महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल, या दृष्टीनं आतापासूनच तयारीला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिले. उद्धव ठाकरे यांच्या एकला चलो रेच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट शिवसेनेला टोला लगावला होता. शिवसैनिकांमध्ये मनोमिलन घडवण्याचं मोठं आव्हान कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गटबाजीत विभागलेली शिवसेना आणि बाजूला पडलेला शिवसैनिक यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेनेचा मार्ग खडतर असल्याची चर्चा आहे. मात्र, नाराज झालेले नेते, पदाधिकारी यांचं मनोमिलन घडवून आणण्याचं मोठं आव्हान उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री तसेच कोल्हापूरचे नूतन जिल्हा संपर्कप्रमुख उदय सामंत यांच्यासमोर असणार आहे. हेही वाचा..मराठा आरक्षणावरून ट्वीट करणाऱ्या चंद्रकांतदादांना जयंत पाटलांचं प्रत्युत्तर राज्यात सत्तेत असूनही सध्या जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेना केवळ निवेदनं, आंदोलनं करण्यापुरतीच उरली आहे, असं चित्र आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदेत शिवसेनेची कोणतीही स्वतंत्र भूमिका नाही. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेला कितपत यश मिळतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Kolhapur, Maharashtra, Shiv sena

पुढील बातम्या