सासऱ्यांनंतर सूनबाईही राष्ट्रवादीच्या वाटेवर? बड्या नेत्याकडून खासदार रक्षा खडसेंचं कौतुक

सासऱ्यांनंतर सूनबाईही राष्ट्रवादीच्या वाटेवर? बड्या नेत्याकडून खासदार रक्षा खडसेंचं कौतुक

खासदार रक्षा खडसे यांच्या आंदोलनाच्या राष्ट्रवादीकडून भूमिकेचं समर्थन केलं जात आहे.

  • Share this:

रत्नागिरी, 7 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच जलसंपदामंत्री जयंत पाटील (Minister Jayant Patil)यांनी भाजपच्या खासदार रक्षा खडसे (BJP MP Raksha Khadse) यांचं कौतुक केलं आहे.

खासदार रक्षा खडसे यांच्या आंदोलनाच्या राष्ट्रवादीकडून भूमिकेचं समर्थन केलं जात आहे. रक्षा खडसे या भारतीय जनता पक्षाच्या खासदार असल्या तरी जिल्ह्यातल्या केळी उत्पादकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने त्या भूमिका मांडत आहेत. त्यात वावगं ते काय?, असा सवाल जयंत पाटील यांनी त्यांच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. यानंतर आता  एकनाथ खडसे यांच्या पाठोपाठ त्यांची स्नुषा आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे देखील राष्ट्रवादीत प्रवेश करतात काय, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

हेही वाचा..व्होरा समितीचा अहवाल प्रसिद्ध होताच उद्धव ठाकरे सरकार पडेल, भाजप नेत्याचा दावा

उत्तर महाराष्ट्रातील (North Maharashtra) ज्येष्ठ नेता एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपला सुमारे 40 वर्षांची साथ सोडली आहे. गेल्या महिन्यात खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी (quits BJP) देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एकनाथ खडसेंच्या पाठोपाठ त्यांची कन्या (Khadse’s daughter) रोहिणी खेवळकर-खडसेही (Rohini Khevalkar-Khadse) त्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

रोहिणी खडसे यांनी 2019 मध्ये जळगावमधील (Jalgaon) मुक्ताईनगर मतदारसंघातून (Muktai Nagar constituency) विधानसभा निवडणूक (Maharashtra assembly election) भाजपच्या तिकिटावर लढवली होती. दुसरीकडे, राष्ट्रवादीत आल्यानंतर एकनाथ खडसे यांना पक्षानं विधान परिषदेवर पाठवण्याची तयारी केली आहे. राज्यपालांकडे पाठवण्यात आलेल्या यादीत एकनाथ खडसेंचं देखील नाव आहे.

दरम्यान, जयंत पाटील यांनी सावर्डे येथे ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत (BJP Leader Chandrakant Patil)पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं. घरात बसून चंद्रकांतदादांनी यांनी ट्वीट करून काय भूमिका व्यक्त केली, यावर मी प्रतिक्रिया व्यक्त करण्याची काही आवश्यकता आहे, असं वाटत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष तलेच राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Minister Jayant Patil) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

महाविकास आघाडीने मराठा तरुणांचा विश्वासघात करण्याचा प्रश्नच नाही. मराठा समाजाचं आरक्षण टिकावं यासाठी, आम्ही प्रयत्न करत असल्याचं जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलं. अर्णव गोस्वामी यांच्यावर कारवाई का झाली, याचा अभ्यास भाजपने केलेला दिसत नाही, असा टोला देखील जयंत पाटील यांनी लगावला. सावर्डे येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा...आरक्षणाचा खेळखंडोबा! मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, चंद्रकांतदादांचा आरोप

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीसाठी आमची शिफारस यादी राज्यपालांकडे (Maharastra Governor) दिली आहे. यावर पुढील 15 दिवसांत निर्णय घ्यावा, अशी विनंती राज्यपालांना सरकारनं केल्याची माहिती जयंत पाटील दिली आहे. राज्यपाल लवकरच यादीला मंजुरी देतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

सर्वांचीच इच्छा आम्ही पूर्ण करू शकत नाही..

आमदारकीसाठी अनेकजण इच्छूक होते. मात्र, सर्वांचीच इच्छा आम्ही पूर्ण करू शकत नाही, असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. ज्यांना संधी मिळाली नाही ते नाराज असणं स्वाभाविक आहे, पण त्यांची नाराजी आम्ही दूर करू, असं जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलं.

Published by: Sandip Parolekar
First published: November 7, 2020, 6:20 PM IST

ताज्या बातम्या