मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'मोदी नामा'ची जादू उतरली, 2024 चा जय-पराजय हातचलाखीच्या खेळावरच ठरेल, सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधानांवर टीका

'मोदी नामा'ची जादू उतरली, 2024 चा जय-पराजय हातचलाखीच्या खेळावरच ठरेल, सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधानांवर टीका

saamana Editorial: शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्त्वावर टीका केली आहे.

saamana Editorial: शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्त्वावर टीका केली आहे.

saamana Editorial: शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्त्वावर टीका केली आहे.

मुंबई, 23 ऑगस्ट: आज पुन्हा शिवसेनेचं (Shivsena mouthpiece) मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून (saamana editorial) भाजपच्या (BJP) नेतृत्त्वावर टीका करण्यात आली आहे. काँग्रेसच्या (Congress) अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी देशभरातील विरोधकांची तीन दिवसांपूर्वी एक बैठक (Meeting) बोलावली होती. या बैठकीवरही अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे.तसंच भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर (BJP Jan Aashirwad yatra)टीका करत जत्रा सुरु केली अशा शब्दात टोमणा हाणला आहे.

वाचूया सविस्तर काय आहे आजच्या सामनाच्या अग्रलेखात

'मोदी नामा'ची जादू उतरली आहे. त्यामुळे 2024 चा जय-पराजय हा हातचलाखीच्या खेळावरच ठरेल. त्याची तयारी, रंगीत तालीम करावी लागेल, नाहीतर जन आशीर्वादाच्या ‘जत्रा’ लोकांना गुंगीचा मंत्र देऊन पुढे निघतील.

मोठी बातमी: 'त्या' हल्ल्यात 300 तालिबानी ठार तर काही कैद

विरोधी पक्षांची एक मोट बांधून 2024 च्या निवडणुकांना सामोरे जावे, असे विचार सुरू झाले आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पुढाकाराने देशातील विरोधी पक्षांची एक बैठक पार पडली. काँग्रेससह 19 राजकीय पक्ष या बैठकीत सामील झाले. 19 पक्ष एकत्र आले व त्यांनी विरोधी पक्षांची ‘मोट’ बांधण्यासंदर्भात चर्चा केली. त्या चर्चेतून कोणते फळ हाती लागले हे महत्त्वाचे. लोकशाही आहे म्हटल्यावर चर्चा तर होणारच, पण फक्त ‘चर्चा पे चर्चा’ नकोत तर देशासमोर एक ठोस कार्यक्रम घेऊन जाणे गरजेचे आहे.

मोदी सरकारने सध्या त्यांच्या मंत्र्यांची एक जन आशीर्वाद ‘जत्रा’ सुरू केली आहे. त्या जत्रेत फक्त विरोधकांविरोधात शिव्याशाप देण्याचेच काम सुरू आहे. या जन आशीर्वाद जत्रेतले अर्धे मंत्री हे विचार व आचाराने उपरे किंवा बाटगे आहेत. म्हणजे काल-परवा भाजपात घुसले व मंत्रीपदाची हळद लावून बोहल्यावर चढले. हे उपरे भाजपचा प्रचार करीत फिरत आहेत व वर्षानुवर्षे भाजपच्या पालख्या उचलणारे कार्यकर्ते त्या ‘जत्रे’त येडय़ाखुळय़ासारखे सामील झाले आहेत, अशी एक गंमत महाराष्ट्रासह देशभरात सुरू असताना विरोधी पक्षांना अधिक विचाराने पावले टाकावी लागतील.

24 तासात 400 भारतीय परतले मायदेशी; अफगाणिस्तानात अडकलेल्यांना भारतानं केलं एअरलिफ्ट 

19 राजकीय पक्ष एकत्र आल्याने लगेच मोदींचे सरकार डळमळीत झाले व गेले या भ्रमात राहता येणार नाही. कारण या एकोणिसात अनेक पक्ष असे आहेत की, त्यांचे ओसाड पडके वाडे झाले आहेत. या पडक्या वाडय़ांची डागडुजी करून त्यांना बरे स्वरूप दिल्याशिवाय एकजुटीचे धक्के समोरच्यांना बसणार नाहीत. विरोधकांच्या एकजुटीचे प्रदर्शन करताना त्याची तटबंदी ढिसाळ पायावर असता कामा नये.

First published:
top videos

    Tags: Amit Shah, Narendra modi, Sanjay raut, Shivsena