मराठी बातम्या /बातम्या /विदेश /24 तासात 400 भारतीय परतले मायदेशी; अफगाणिस्तानात अडकलेल्यांना भारतानं केलं एअरलिफ्ट

24 तासात 400 भारतीय परतले मायदेशी; अफगाणिस्तानात अडकलेल्यांना भारतानं केलं एअरलिफ्ट

रविवारी भारतानं एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या विमानातून चारशे भारतीयांना मायदेशी आणलं आहे.

रविवारी भारतानं एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या विमानातून चारशे भारतीयांना मायदेशी आणलं आहे.

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानच्या युद्धभूमीत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रत्येक देश आपापल्या परिनं प्रयत्न करत आहेत. भारतानं देखील आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मोहिम राबवली आहे.

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट: मागील काही दिवसांपासून अफगाणिस्तानात हाहाकार उडाला आहे. संपूर्ण देशात अराजक पसरलं असून येथील नागरिक आपला जीव मुठीत घेऊन देशाबाहेर पलायन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर अफगाणिस्तानच्या युद्धभूमीत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रत्येक देश आपापल्या परिनं प्रयत्न करत आहेत. भारतानं देखील आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मोहिम राबवली आहे. रविवारी भारतानं एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या विमानातून चारशे भारतीयांना मायदेशी (400 Indians return home) आणलं आहे.

यामध्ये दोन अफगाणी खासदारांसह काही हिंदू आणि शीख अफगाण नागरिकांचा देखील समावेश आहे. भारतीय विमानानं रविवारी काबूलसह कतार आणि ताजिकिस्तान या तीन देशातून तीन उड्डाणं घेतली आहेत. या तीन विमानातून 400 जणांना मायदेशी आणण्यात आलं आहे. यामध्ये 329 भारतीयांचा समावेश आहे. तर अन्य काही अफगाण हिंदू आणि शीख नागरिक आहेत. यामध्ये दोन अफगाण खासदारांसह त्यांच्या कुटुंबाचा देखील समावेश आहे.

हेही वाचा-युद्धभूमीतून परतूनही चिमुकल्यांचं हास्य हटलं नाही; निरागस भावंडाचा VIDEO व्हायरल

रविवारी सर्वप्रथम अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथून 168 नागरिकांना घेऊन आलेलं भारतीय हवाई दलाचं सी-17 हे विमान दिल्लीजवळील हिंडोन विमानतळावर उतरलं. या विमानातून आलेल्या नागरिकांमध्ये 23 अफगाण शीख आणि हिंदूचा समावेएश होता. सोबतच अफगाणिस्तानचे संसद सदस्य अनारकली होनरयार आणि नरेंद्र सिंग खालसा तसेच त्यांचे कुटुंबीयांचा देखील यामध्ये समावेश होता, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली आहे.

हेही वाचा-म्हणून हा ब्रिटीश नागरिक अफगाणिस्तान सोडायला नाही तयार; कारण वाचून वाटेल अभिमान

ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बे येथून एअर इंडियाच्या खास विमानानं रविवारी 87 भारतीयांसह दोन नेपाळी लोकांना दिल्लीत आणण्यात आलं आहे. या नागरिकांना सर्वप्रथम हवाई दलाच्या विमानानं काबूलवरून ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बे याठिकाणी आणण्यात आलं होतं. तर कतारची राजधानी दोहा येथूनही काल 135 जणांना भारतात आणण्यात आलं आहे. काबूलमधील परिस्थिती चिघळल्यानंतर या सर्वांची सुटका करत त्यांना कतार येथे आणण्यात आलं होतं. या सर्वांना काल एका खास विमानानं दिल्लीला आणण्यात आलं आहे. यामध्ये काहीजण परदेशी कंपन्यांचे भारतीय कर्मचारी आहेत. ते अफगाणिस्तानात काम करीत होते, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनं दिली आहे.

First published:
top videos

    Tags: Afghanistan, Taliban