अफगाणिस्तान, 23 ऑगस्ट: तालिबाननं (Taliban in Afghanistan)काबुलवर (Kabul) कब्जा मिळवला मात्र अद्याप पंजशीर (Panjshir valley) खोऱ्यावर आपला कब्जा मिळवता आलेला नाही. तालिबाननं या खोऱ्यावर विजय मिळवण्याची मोहिम सुरु केली खरी पण पंजशीरच्या लढवय्यांनी त्यांना चांगलीच टक्कर दिली. तालिबानविरोधी शक्ती त्याच्या लढवय्यांना मोठे आव्हान देत आहेत. एकीकडे पंजशीरमध्ये दोघं लढत असताना दुसरीकडे बागलान प्रांतात तालिबानला (Taliban) मोठा झटका बसला आहे. एका हल्ल्यात 300 तालिबान ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे, तर अनेकांना कैद केल्याचंही सांगितलं जात आहे. बागलानमध्ये 300 तालिबानी ठार? बीबीसीच्या पत्रकार यालदा हकीम यांनी ट्विट केलं आहे की, बागलानच्या अंद्राबमध्ये लपलेल्या तालिबानींवर हा मोठा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात तालिबानचं मोठं नुकसान झालं आहे. तालिबानविरोधी लढवय्यांनी दावा केला आहे की, या हल्ल्यात 300 तालिबान ठार झालेत. या हल्ल्यानंतर अनेक तालिबानांना कैद केल्याचंही वृत्त आहे.
Update from the Anti-Taliban resistance - they tell me: Taliban ambushed in Andarab of Baghlan province. At least 300 Taliban fighters were killed. The group is lead by #AhmadMassoud & @AmrullahSaleh2 #Afghanistan pic.twitter.com/uJD1VEcHY1
— Yalda Hakim (@SkyYaldaHakim) August 22, 2021
24 तासात 400 भारतीय परतले मायदेशी; अफगाणिस्तानात अडकलेल्यांना भारतानं केलं एअरलिफ्ट अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनीही या हल्ल्याकडे लक्ष वेधले आहे. एका ट्विटच्या माध्यमातून तालिबान्यांना टोमणा मारत ते म्हणाले की, जेव्हापासून तालिबानवर मोठा हल्ला झाला आहे, त्याच्यासाठी एका तुकड्यात जिवंत परत येणे देखील एक आव्हान होते. आता तालिबानने पंजशीर खोऱ्यात आपल्या लढाऊ सैनिकांची संख्या वाढवली आहे.
तालिबानविरोधी लढवय्यांनी अफगाणिस्तानच्या उत्तर बागलान प्रांतातील तीन जिल्ह्यांतून तालिबान्यांना हाकलून लावले होते. त्यांनी शुक्रवारी पुल-ए-हिसार, देह सालाह आणि बानू जिल्हे ताब्यात घेतले होते. पण तालिबान्यांनी शनिवारी पुन्हा बानू जिल्ह्यावर कब्जा केला. आता उर्वरित दोन जिल्हे परत मिळवण्यासाठी तालिबान लढाई लढत आहेत. दुसरीकडे तालिबान पंजशीरच्या दिशेनं वाटचाल करत असून तिथे मोठ्या हल्ल्याची तयारी करत आहेत.